येरवडा कारागृहात हिंदू राष्ट्र सेनेचा समर्थक तुषार हंबीरवर खुनी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 15:24 IST2019-07-02T13:34:12+5:302019-07-02T15:24:21+5:30
येरवडा जेल येथे सकाळी दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली.

येरवडा कारागृहात हिंदू राष्ट्र सेनेचा समर्थक तुषार हंबीरवर खुनी हल्ला
पुणे:येरवडा येथे सकाळी सातच्या सुमारास खुनातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली. या घटनेत शाहरुख शेख या आरोपीने कारागृहातील शौचालयाच्या बाहेर तुषार हंबीर या कैद्याच्या डोक्यासह मानेवर खिळ्यांनी वार करून त्याला गंभीर जखमी केले. तुरुंग प्रशासन व पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात असलेल्या तुषार हंबीरवर शाहरुख शेख याने खिळ्याने वार केले. तुषार हंबीर हा हिंदु राष्ट्र सेनेचा तसेच धनंजय देसाई यांचा कट्टर समर्थक आहे़. सुमारे वर्षापूर्वी खडी मशीन येथे झालेल्या खुन प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे़. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात आहे़. शाहरुख खान हा कोंढव्यात झालेल्या खुन प्रकणातील आरोपी आहे़.
तुषार हंबीर आणि त्याच्यावर हल्ला करणारे दोघेही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे तुरुंग अधीक्षक व्ही़. टी़. पवार यांनी सांगितले़. या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हंबीर याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ तुरुंग आणि पोलीस दाखल झाले आहे. ही घटना घडल्यावर तुरुंग प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.