वेगाची क्रेझ नडली, बाईकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:43 AM2018-05-08T03:43:32+5:302018-05-08T03:43:32+5:30

महागड्या स्पोर्ट्स बाईकची क्रेझ तरुणात वाढत चालली असून रात्री-अपरात्री वाऱ्याच्या वेगाने जाण्याचे वेड लागले आहे़ या वेडामुळे मोटारसायकलवरील दोघा तरुणांना आपला जीव गमवावा लागला असून स्वत: स्पोर्ट्स बाईकस्वारही गंभीर जखमी झाला आहे.

two Death In Accident | वेगाची क्रेझ नडली, बाईकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

वेगाची क्रेझ नडली, बाईकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Next

पुणे - महागड्या स्पोर्ट्स बाईकची क्रेझ तरुणात वाढत चालली असून रात्री-अपरात्री वाऱ्याच्या वेगाने जाण्याचे वेड लागले आहे़ या वेडामुळे मोटारसायकलवरील दोघा तरुणांना आपला जीव गमवावा लागला असून स्वत: स्पोर्ट्स बाईकस्वारही गंभीर जखमी झाला आहे़
संजीव सिंग जयंत सिंग (वय २४) आणि प्रल्हाद सिंग कर्नल सिंग (वय ४०, दोघे रा़ कुमार पाल्म्स लेबर कँप, उंड्री, मूळ जम्मू काश्मीर) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत़ रेहान रिझवान कॉन्ट्रॅक्टर (वय २१, रा़ कोणार्कपूरम, कोंढवा) व त्याचा मित्र जिया इक्बाल हबीब (वय २०) हे दोघे जखमी झाले आहेत़ हा अपघात एनआयबीएम रोडकडून कडनगर चौकाकडे जाणाºया रोडवरील कुमार पाल्म्स लेबर कॅम्पसमोर रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडला़
याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले, की रेहान कॉन्ट्रॅक्टर हा आपला मित्र जिया इक्बाल हबीब याला घेऊन स्पोर्ट्स बाईकवरून एनआयबीएम रोडकडून कडनगर चौकाकडे जात होते़ त्याने समोरून येणाºया मोटारसायकलला जोराने धडक दिली़
ही धडक इतकी जोरात होती, की समोरच्या मोटारसायकलचे चाक निखळून पडले़ त्यावरील संजीव सिंग आणि प्रल्हाद सिंग यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला़
कॉन्ट्रॅक्टर याच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले़ रेहान व जिया हे दोघेही जखमी झाले आहेत़ कोंढवा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: two Death In Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.