शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील खड्डे ‘खाता’हेत महिन्याकाठी दोन कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 06:00 IST

रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींच्या टीकेचे धनी...

ठळक मुद्देरिसर्फेसिंगची कामे : जानेवारीपासून २२ कोटींच्या आसपास झाला खर्चखोदाईमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीकामाचा दर्जा तपासण्यासोबतच हे काम वेळेत पूर्ण होईल हे पाहण्याची जबाबदारी

लक्ष्मण मोरे- पुणे : पुणे शहर ‘मोस्ट लिव्हेबल सिटी’ ठरल्यामुळे की काय पण सर्वच महाग होत चालले आहे. मग त्याला पुण्यातील रस्ते तरी कसे अपवाद ठरतील. रस्तेच काय परंतू, रस्त्यांवरील खड्डे सुद्धा महागडे ठरु लागले आहेत. पुण्यातील खड्डे महिन्याकाठी दोन कोटी रुपये ‘खात’ आहेत. शहरातील रस्त्यांच्या ‘रिसर्फेसिंग’ वर जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये तब्बल २२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून यामध्ये पावसाळ्यानंतर करण्यात आलेल्या कामांचाही समावेश आहे. शहरात एकूण चौदाशे किलोमीटरचे रस्ते असून यातील एक हजार किलोमीटरच्या डांबरी रस्त्यांवर या पैशातून कामे झाल्याचे पथ विभागाकडून सांगण्यात आले आहे. परंतू, अद्यापही बहुतांश भागात खड्डे आणि रस्त्यांची बिकट अवस्था असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन पालिकेच्या मुख्य सभेमध्येही पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींच्या टीकेचे धनी ठरले आहे. शहरात मेट्रो तसेच अन्य विकास कामांमुळे होत असलेल्या त्रासाला नागरिक कंटाळलेले आहेत. आजही शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये रस्त्यांची खोदाई सुरू असून, पालिकेच्या विविध विभागांमधील समन्वयाअभावी रस्ते वारंवार खोदावे लागत आहेत. खोदाईमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. कूर्मगतीने चालणाऱ्या या कामांमुळे पुणेकरांचा मात्र संताप वाढू लागला आहे. वाहनचालकांना तर कसरत करतच वाहने चालवावी लागतात. रस्त्यांच्या कामांच्या सुमार दर्जामुळे वारंवार रस्ते उखडणे, खड्डे पडणे आदी कामांकरिता वारंवार खर्च करावा लागत आहे. यासोबतच रस्त्याचे काम झाल्यानंतर ड्रेनेज, जलवाहिनी, विद्युतवाहिनी अथवा एमएनजीएलच्या गॅसवाहिनीसाठी रस्ता पुन्हा खोदावा लागतो. रस्त्यांची कामे अर्धवट ठेवणाऱ्या तसेच ही कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर मात्र फारशी कारवाई होताना दिसत नाही. कामाचा दर्जा तपासण्यासोबतच हे काम वेळेत पूर्ण होईल हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या ‘प्रायोरिटी’ ठरलेल्या असल्याने रस्त्यांची वारंवार खोदाई केली जात असल्याचे चित्र आहे. पालिकेने रस्त्यांच्या दुरुस्ती, रिसर्फेसिंग, खड्डे बुजविणे आदी कामांकरिता आतापर्यंत २२ कोटी खर्च रुपये केले आहेत. पावसाळ्यात बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडले होते. त्यातील मालही वाहून गेला होता. पालिकेने वापरलेले केमिकलही उपयोगी ठरले नव्हते. महिन्याकाठी रस्त्यांच्या या किरकोळ कामांवरच दीड कोटींपेक्षा अधिक खर्च होत आहे. हा खर्च केवळ पथ विभागाचाच नसून यामध्ये स्थानिक क्षेत्रिय कार्यालयांमार्फत केली जाणाºया कामांचाही समावेश आहे. समाविष्ठ गावांसह संपुर्ण हद्दीमध्ये एकून ६.५ लाख चौरस मीटरचे डांबरीकरण या दुरुस्तीच्या कामांमध्ये करण्यात आले आहे. रिसर्फेसिंगच्या कामांसाठी आस्फेट (एसी) आणि डेन्स बिट्युमायनस मॅकॅडम (डीबीएम) या मालाचा वापर केला जातो. वर्षभरात साडेसात मेट्रिक टन एसी आणि ६५ मेट्रिक टन डीबीएमचा वापर करण्यात आला आहे. पालिकेच्या पथ विभागाकडून यातील बहुतांश कामे करण्यात आलेली असली तरी प्रकल्प विभाग, वाहतूक विभाग, स्थानिक क्षेत्रिय कार्यालयांकडून मोठ्या प्रमाणावर कामे झालेली आहेत. यामध्ये रस्त्यांसह उड्डाणपूल, पुलांखालील रस्त्यांचाही समावेश आहे. यामध्ये रिसरफेसिंग, रस्ते दुरुस्ती, पॅच वर्क, खड्डे दुरुस्तीची कामे करण्यात आलेली आहेत. =====शहरात २५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांचाही यामध्ये समावेश आहे. परंतू, नव्याने रस्ते बांधणे, कलव्हर्ट बांधणे वगैरे कामांचा यामध्ये समावेश नाही. शहरात एकूण चौदाशे किलोमीटरचे रस्ते असून त्यातील ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंटचे आहेत. आतापर्यंत २२ कोटी रुपये खर्च करुन केलेली कामे प्रामुख्याने डांबरी रस्त्यावर झालेली आहेत. 

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका