दुर्दैवी! आडगावमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 11:03 IST2022-10-31T11:00:38+5:302022-10-31T11:03:53+5:30

दोन मुले पाण्यात बुडून मृत पावली आहेत...

Two children who went swimming in Adgaon drowned pune latest news | दुर्दैवी! आडगावमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

दुर्दैवी! आडगावमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

पाईट (पुणे) : आडगाव (ता. खेड) येथे काल दुपारी ३.३० च्या सुमारास तीन मुले वय वर्षे (१५-१६) पोहोचण्यासाठी गेली होती. त्यापैकी दोन मुले पाण्यात बुडून मृत पावली आहेत. सार्थक राजेंद्र ढोरे (वय १५), शिवम शंकर गोपाळे (वय १५), प्रतीक संजय गोपाळे ( वय १५) हे आडगाव येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले असता त्यामधील सार्थक ढोरे व शिवम गोपाळे यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला तर प्रतीक गोपाळे हा बचावला आहे.

ग्रामस्थांना या मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले नाही. यामधील सार्थक राजेंद्र ढोरे हा मामाकडे दिवाळीच्या सुट्टीत आला होता, एकाच वेळी दोन मुले पाण्यात बुडाल्याने गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांवर मोठा आघात झाला आहे.

पोलीस व प्रशासन विभाग व गावकरी यांच्या मदतीने शोध घेतला असता अद्यापपर्यंत दोन्ही मुलांचा शोध लागला नाही. शोध कार्यासाठी रेस्क्यू टीम व NDRF जवान यांना कळविले असून आज त्यांच्या मदतीने पुन्हा एकदा शोध घेतला जाईल. घटनास्थळी मृत मुलांचे नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Two children who went swimming in Adgaon drowned pune latest news