शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिरुर तालुक्यात झोपडीला लागलेल्या अचानक आगीत दोन लहान मुलांसह एकाचा दुर्देवी अंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 19:03 IST

झोपडीला अचानक लागलेल्या आगीमध्ये दोन लहान मुलांसह एकाचा जळुन दुर्देवी मृत्यू झाला.

 शिरुर (टाकळी हाजी) : शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे झोपडीला अचानक लागलेल्या आगीमध्ये दोन लहान मुलांसह एकाचा जळुन दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना घटना घडली.   याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदाबाद गावापासुन एक किलोमीटर अंतरावर आदिवासी भिल्ल समाजाची ३५ घरांची वस्ती असून अनेकांची घरे छपरांची व ऊसाच्या पाचटाने शेकरलेली आहे. सोमवारी (दि. २९) दुपारी चार च्या दरम्यान अचानक लालु आनंदा गावडे यांच्या घराला आग लागली. घरामध्ये दोन लहान मुले झोपली होती. त्यांना वाचवायला घरात घुसलेल्या लालु यांना धुर व आगीमुळे त्या चिमुरडयांना घेऊन बाहेरचं पडता आले नाही. त्यामधे लालू आनंदा गावडे (वय ३५)यांच्यासह त्यांचा मुलगा दादू लालु गावडे वय (साडेतीन वर्षे), त्यांच्या मेहुण्यांची मुलगी प्राजु अरुण पवार (वय अडीच वर्ष ), हे तिघे जागीच जळुन खाक झाले. तर पत्नी उषाबाई लालू गावडे , अरूण फक्कड पवार, बारकुबाई फक्कड पवार हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तत्काळ रूग्णालयात पाठविण्यात आले. या आगीत शेजारी असलेल्या चार झोपडया व त्यांच्या संसार उपयोगी वस्तु जळुन गेल्या आहेत. उषाबाई हिला एक मुलगा व चार मुली आहेत.   सरपंच योगेश थोरात यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. आग विझविण्यासाठी अग्निशामक यंत्रना तत्काळ दाखल झाली. शिरूर चे माजी आमदार पोपटराव गावडे, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, गटविकास अधिकारी संदीप जठार, घोडगंगाचे संचालक रंगनाथ थोरात, पंचायत समितीचे सदस्य सुभाष पोकळे यांनी भेट दिली.या आदिवासींसाठी एका कंपनीने ३५ घरकुल बांधुन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागा गायरान जमीन असुन, शिरुरच्या भूमिअभिलेख अधिकारी अनेक वेळा हेलपाटे घालुन सुद्धा योग्य सहकार्य करत नसल्याने, घरकुले बांधण्यात विलंब झाला आहे. जर पक्के घरे अस्तित्वात असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे माजी सरपंच योगेश थोरात यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :ShirurशिरुरAccidentअपघातfireआगDeathमृत्यू