शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

रेल्वेच्या कसरतीचे '' ते '' बारा दिवस..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 6:54 PM

सुमारे ३०० अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी रात्रंदिवस मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

ठळक मुद्देनियंत्रण कक्षावर ताण

पुणे : रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी दगड-माती बाजूला करण्याचे आव्हान... मुसळधार पावसाने सतत दरडी कोसळण्याचा धोका... तर दुसऱ्या बाजुला दरी... पावसाने मार्ग खचलेला, रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झालेले... खानपानही वेळेत नाही... अशा अनंत अडचणींचा सामना करत तब्बल बारा दिवस रेल्वेचे सुमारे ३०० अधिकारी व कर्मचारी कर्जत-लोणावळादरम्यानच्या घाटात झटत होते. रात्रं-दिवस काम करून त्यांनी बंद पडलेली रेल्वेसेवा पुर्ववत केली. कर्जत ते लोणावळादरम्यान घाटात मंकी हिलजवळ दि. ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. यावेळी सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. त्यापुर्वी या परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पण या घटनेने मध्य रेल्वेचे कंबरडे मोडले. दरडीमुळे पुणे व मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली. दरडीने रेल्वेमागार्चे मोठे नुकसान झाले. मुसळधार पावसाने रेल्वेमार्ग खचला होता. सिग्नल यंत्रणेच बिघाड निर्माण झाला. मागार्खालील खडी वाहुन गेली होती. त्यामुळे दरड बाजूला करून रेल्वेमार्ग सुरळीत करण्याचे मोठे आव्हानात्मक काम रेल्वेवर होते. दोन-तीन दिवसांत हे काम पुर्ण होईल, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांना होती. पण मुसळधार पाऊस थांबता-थांबत नसल्याने कामात अनेक अडचणी आल्या. अधून-मधुन ठिकठिकाणी माती व दगड मार्गावर येत होते. त्यामुळे रेल्वेपुढच्या समस्यांमध्ये भरच पडत चालली होती.याविषयी ह्यलोकमतह्णशी बोलताना मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार म्हणाले, जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळणे, भुस्खलन होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. रेल्वेमार्गाचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे सुमारे ३०० अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी रात्रंदिवस मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. एका बोगद्याचे तर खुप नुकसान झाले होते. ते दुरूस्त करण्यासाठी काही वर्ष लागतील, असे कुणालाही वाटले असते. पण रेल्वेची यंत्रणा मोठी आहे. वेगवेगळ्या  मशिनच्या सहाय्याने काम करण्यात आले.मार्गाखालची माती वाहुन गेल्याने भराव टाकण्याचे काम कठीण होते. पावसाने त्यात खुप अडचणी आल्या. अभियांत्रिकी विभागातील काही अधिकारी तर पुर्ण १२ दिवस घाट परिसरातच राहायला होते. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना खानपानाची व्यवस्था केली जात होती. त्यासाठी रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा असते. सलग बारा दिवस परिश्रम केल्यानंतर शुक्रवारी वाहतुक सुरळीत झाली.

....

पुणे-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने यामार्गे जाणाºया अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले. काही गाड्या अंशत: रद्द झाल्या. त्यामुळे इतर मार्गांवरही ताण आला. लांब पल्याच्या गाड्या विलंबाने धावत होत्या. पावसाने ठिकठिकाणचे मार्ग बंद पडल्याने सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली. त्यामुळे सर्व गाड्यांचे मार्ग, वेळा निश्चित करण्याचा ताण रेल्वेच्या नियंत्रण कक्षावर होता. या कक्षातील अधिकारी-कर्मचारी २४ तास कार्यरत राहून गाड्यांचे नियंत्रण करत होते.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासी