वंशाला दिवा हवा म्हणून विवाहितेच्या शरीरावर फासलं हळद - कुंकू; चाकणमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:11 IST2021-08-29T17:11:10+5:302021-08-29T17:11:19+5:30

अघोरी कृत्य करणाऱ्या पती, सासू आणि भोंदूबाबांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

Turmeric - Kunku; Shocking incident in Chakan | वंशाला दिवा हवा म्हणून विवाहितेच्या शरीरावर फासलं हळद - कुंकू; चाकणमधील धक्कादायक घटना

वंशाला दिवा हवा म्हणून विवाहितेच्या शरीरावर फासलं हळद - कुंकू; चाकणमधील धक्कादायक घटना

ठळक मुद्देमुलगा असावा, असा पती आणि त्याची आई या दोघांचा आग्रह

चाकण : दोन्ही मुली झाल्यानंतर वंशाला दिवा हवा म्हणून पती आणि सासू या दोघांनी मिळून पत्नीच्या संपूर्ण शरीरावर भोंदूबाबाकडून आणलेला अंगारा आणि हळदी कुंकू फासला. विवाहितेच्या छळाची ही अत्यंत धक्कादायक घटना खेड तालुक्यातील खालुंब्रे येथे घडली. अघोरी कृत्य करणाऱ्या पती, सासू आणि भोंदूबाबांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला दोन मुली झाल्या. या कारणावरून तसेच लग्नामध्ये फिर्यादीच्या आईवडिलांनी मानपान केला नसल्याच्या कारणावरून आरोपींनी विवाहितेला वेळोवेळी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वंशाला दिवा म्हणून मुलगा असावा, असा नराधम पती आणि त्याची आई या दोघांचा आग्रह होता. त्यामुळे  महिलेवर ते वारंवार अत्याचार करत होते. हे दोघे कामशेत मावळ तालुक्यातील एका भोंदूबाबाकडे महिलेला घेऊन गेले. भोंदूबाबा समोर महिलेला बसवल्यावर बाबाने हातातील कवड्या जमिनीवर टाकून तोंडाने मंत्र पुटपुटत हिशेब केल्याचे हातवारे केले. मुलगा होण्यासाठी अंगारा खाण्यासाठी दिला. तसेच काही अंगारा कागदामध्ये बांधून दिला. 

भोंदूबाबाने सांगितल्यानुसार पती व त्याच्या आईने महिलेला संपूर्ण कपडे उतरविण्यास सांगितले. त्यानंतर पीडित फिर्यादीच्या शरीरावर अंगारा व हळदीकुंकू लावला. आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे महिला पार घाबरली. त्यामुळे पीडित महिलेने खेड तालुक्यातील महाळुंगे पोलीस चौकीत धाव घेतली. आपल्यासोबत घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम ३ नुसार तसेच विनयभंग केल्याप्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Turmeric - Kunku; Shocking incident in Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.