शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

Pune Crime: महिलेच्या छेडछाडीवरून तुंबळ हाणामारी; पुण्यात धारदार शस्त्राने दोघांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 16:18 IST

फरारी खुनी हल्लेखोराच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना

चाकण : औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी ( ता.खेड ) येथे महिलेच्या छेडछाडीमधून झालेल्या वादातून एकाने धारदार शस्त्राने दोन जणांची हत्या केली.  या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फरारी खुनी हल्लेखोराच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सूरज नंदकुमार चव्हाण (वय.२७ वर्षे,सध्या रा. सावरदरी) आणि अनिकेत किसन पवार (वय.२४ वर्षे,सध्या रा. तरस यांची भाड्याची खोली,सावरदरी) या दोघांवर चाकू सारख्या धारदार हत्याराने हल्ला करून खून केल्याप्रकरणी प्रदीप दिलीप भगत ( सध्या रा.शिवमपार्क,सावरदरी ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना भक्ती अपार्टमेंट समोर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी गावामध्ये वरील सर्व जण भाडेकरू म्हणून राहत आहेत. सूरज चव्हाण हा आपल्या कुटुंबासह राहत आहे. यापूर्वी प्रदीप हा फिर्यादीच्या शेजारील महिलेची वारंवार छेड काढत होता. प्रदीप याने आज (दि.८) रोजी सदर महिलेच्या बाथरूमची खिडकी फोडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सूरज चव्हाण त्याचा मित्र अनिकेत आणि प्रदीप यांच्यात तुंबळ हाणामारी होऊन प्रदीप याने दोघांवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. सूरज आणि अनिकेत यांना वर्मी घाव लागल्याने एक जण जागेवरच कोसळला. तर एक गंभीर जखमीस स्थानिक नागरिकांनी अधिक उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी येथील भाडेकरू म्हणून राहत असलेल्या लोकांमध्ये वाद निर्माण होऊन त्यातून डबल मर्डर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महाळुंगे पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खुन करून फरारी झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यूChakanचाकण