विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीत प्राण फुंकण्याचे प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 20:07 IST2019-08-26T20:04:11+5:302019-08-26T20:07:12+5:30

पक्षाला लागलेली गळती, अंतर्गत गटबाजीमुळे जेरीस आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर संघटनेमध्ये प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

try for new energy in the city ncp | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीत प्राण फुंकण्याचे प्रयत्न 

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीत प्राण फुंकण्याचे प्रयत्न 

ठळक मुद्दे८० समाजकारण राजकारण व २० टक्के राजकारण या सूत्राने काम करण्याच्या सूचना

पुणे : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाला लागलेली गळती, अंतर्गत गटबाजीमुळे जेरीस आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर संघटनेमध्ये प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. नव्याने नियुक्त्या करण्यात आलेल्या विविध सेल्सच्या पदाधिकाऱ्यांच्या रॅपिड फायर बैठका सोमवारी पक्षाच्यावतीने घेण्यात आल्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच आगामी विधानसभेच्या तयारीच्या अनुषंगाने विविध विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली. 
या बैठकांबाबत खासदार अ‍ॅॅड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अ‍ॅड. चव्हाण म्हणाल्या, नुकतीच पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाºयांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या आहेत. या सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या दिवसभर विविध बैठका घेण्यात आल्या. लोकांसमोर जाताना पक्के कार्यक्रम घेऊन जाणे तसेच ८० समाजकारण राजकारण व २० टक्के राजकारण या सूत्राने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. निवडणूकीच्या अनुषंगाने विविध सेलना जबाबदाºया वाटून देण्यात आल्या आहेत. 
महिला सक्षमीकरण, युवती व तरुणींमध्ये मासिक पाळीबाबत आणि सॅनिटरी पॅडच्यावापराबाबत जनजागृती, स्वच्छता, महाविद्यालयीन तरुणांशी संवाद, बेरोजगारी, मुलींचे स्व-संरक्षण, सामाजिक कायार्साठी फॅशन शो, टिकटॉकचा वापर, झोपडपट्ट्यांमधील स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न याविषयी काम करावे अशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले. 
तर, तुपे म्हणाले, पक्षाच्या या बैठकांना पक्षाचे सर्व माजी महापौर, आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष संघटना मजबूत करणे, विधानसभेच्यादृष्टीने तयारी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. पक्षाची बूथ लेवलपर्यंतची तयारी झाली असून मतदार संघनिहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच मतदारसंघनिहाय कार्यकर्ता मेळावे घेतले जाणार आहेत. आठही मतदार संघांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र काम करणार असल्याचे तुपे म्हणाले.

Web Title: try for new energy in the city ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.