चाकण येथे ट्रकने बालकास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 13:23 IST2018-04-07T13:23:49+5:302018-04-07T13:23:49+5:30
दुचाकी घसरून खाली पडलेल्या १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने झालेल्या अपघातात मुलगा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

चाकण येथे ट्रकने बालकास चिरडले
चाकण : दुचाकी घसरून खाली पडलेल्या १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने झालेल्या अपघातात मुलगा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगेश माधवराव खंदारे ( वय ४२, रा. श्रीराम नगर ,लवकुश सोसायटी ,चाकण ) हे आपला मुलगा दर्शन याच्यासोबत अॅक्टिवा गाडीवरून खराबवाडी येथे कामा निमित्त निघाले होते. चाकण - तळेगाव रस्त्यावरील राणूबाई मळा येथे त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्टयावरून घसरली. त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेला दर्शन व मंगेश असे दोघे रस्त्यावर पडले असता पाठीमागून येत असलेल्या भरधाव ट्रकचे चाक दर्शनच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहना सहित घटनास्थळावरून पळून गेला. या अपघाताप्रकरणी मंगेश खंदारे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहे. .