पिंपरीत ट्रकची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: November 25, 2024 17:43 IST2024-11-25T17:43:06+5:302024-11-25T17:43:06+5:30
अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक केली.

पिंपरीत ट्रकची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
पिंपरी : चिखली परिसरातील जाधववाडी येथे एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. त्याला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात शनिवारी (दि. 23) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला.
गणेश शहाजी देशमाने (वय ४१), हनुमंत जीवन धारवडकर (४०) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत शहाजी देशमाने (२६, रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हुलाजी उर्फ मोहन महादू सोडगीर (४२, रा. मोशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ गणेश देशमाने आणि त्यांचा मेहुणा हनुमंत धारवडकर हे दुचाकीवरून जात होते. ते सावतामाळी रोडवर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक केली.