पुणे - जुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 11:11 IST2018-07-21T09:24:48+5:302018-07-21T11:11:50+5:30
ट्रकमध्ये अजून काही जण अडकल्याची भीती

पुणे - जुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला, दोघांचा मृत्यू
पुणे - शिवाजीनगर येथे कामगार पुतळ्याजवळील जुना संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ट्रकमध्ये अजून काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे़.
#Maharashtra: Two people killed after a truck fell off a bridge in Pune's Shivajinagar. Fire brigade and police present at the spot. pic.twitter.com/q2VnqcRBuK
— ANI (@ANI) July 21, 2018
कामगार पुतळ्याकडून जुन्या बाजारकडे भरधाव वेगाने जात असताना ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रेल्वे पूल व जुना संगम पूल यांच्या मधल्या भागातील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. शिड्या लावून जवान नदीपात्रात उतरले़ असता ट्रक उलटा कोसळल्याचं दिसले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.