truck broke down on flower ; One woman injured in the accident | उड्डाणपुलावर ट्रकचा ब्रेक निकामी ; अपघातात एक महिला जखमी
उड्डाणपुलावर ट्रकचा ब्रेक निकामी ; अपघातात एक महिला जखमी

धनकवडी : सातारा रस्ता बीआरटी मार्गावरून कात्रजकडे जाणारा ट्रक सदगुरू शंकर महाराज उड्डाणपूलाच्या चढावर बंद पडताच उताराने मागे येवून झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जखमी झाली. याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कात्रजकडे जाणारा ट्रक इंजिन गरम झाल्यामुळे बंद पडला व पाठीमागे येऊ लागला. चालकाने ब्रेक थांबून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता , ब्रेक निकामी असल्याचे लक्षात आले. चालकाने गाडी उड्डाणपूलाच्या सिमा भिंतीवर घातली , दरम्यान पाठीमागून येणाऱ्या महिला दुचाकी स्वार ट्रक आणि सिमा भिंत या मध्ये आल्याने जखमी झाली असून तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परशुराम तरडे असे वाहन चालकाचे नाव आहे. सहकारनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील पद्मावती येथे सुरू असलेले पुनर्विकासाचे काम आणि उड्डाणपूला झालेल्या अपघातामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी चा सामना करावा लागला. जवळपास दोन तास ट्रक घटनास्थळी असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 


Web Title: truck broke down on flower ; One woman injured in the accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.