शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गिरीश कर्नाड यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 21:30 IST

 साहित्य, सिनेमा,नाटक या क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या गिरीश कर्नाड यांचा जीवन प्रवास नक्कीच थक्क करणारा आणि प्रेरणादायी होता..

गिरीश हा माझा अत्यंत जवळचा मित्र होता. भारतीय रंगभूमीवरील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा तो एकमेव नाटककार होता. आता काय बोलावं सुचतं  नाहीये. त्याची जागा भरून येणं अवघड आहे. एक पोकळी निर्माण झाली आहे- महेश एलकुंचवार, ज्येष्ठ नाटककार--------------------------------------------------------सत्तरीच्या दशकात पुण्यातील एफटीआयआयच्या संचालकपदी कार्यरत असल्यापासून गिरीशला मी ओळखत आहे. त्याची अनेक नाटके भारतीय मिथ्यकांवर असली तरी ती कालसुसंगत राहिली आहेत. त्याच्या निधनाने भारतीय आधुनिक रंगभूमीचे चारही  आधारस्तंभ आज आपण गमावले आहेत. कलाकृतीमधून एखादा विचार मांडायला ते कधीही घाबरले नाहीत. त्यांनी स्वत:चे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम जपले. लोकशाहीचे हे मूल्य त्यांनी वारंवार सिद्ध करून दाखविले. गिरीश हे अत्यंत पारदर्शक व्यक्तिमत्व होते. ज्याने नवीन नाटककारांना नेहमीच सहकार्य केले. मी आज वरिष्ठ मित्र आणि तत्वज्ञानी व्यक्तिमत्वास मुकलो आहे- सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार------------------------------------------------------------ साहित्य, सिनेमा,नाटक या कला कशा जोपासाव्या तसेच चांगल्या विचारांना प्रवृत्त करेल, अशी कलाकृती कशी घडवायची किंवा विचार कसा करायचा हा संस्कार गिरीशमुळे व्हायचा. गिरीश बुद्धिवादी कलाकार होता. शैक्षणिक दृष्टी त्याच्याकडे होती. गिरीश काय किंवा डॉक्टर लागू काय यांच्या कलेमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद सतत डोकावतो. गिरीश वागायला साधा होता. आता कलाकार अमुत-तमुक पक्षाचे असतात. गिरीश तसा नव्हता. तो स्वतंत्र अस्तित्व जपणारा होता. तो निर्भीडतेने बोलायचा. एफटीआयआयचा अध्यक्ष म्हणून त्याने कधीही थाट करून घेतला नाही. तो इंग्लंडला गेला नसता तर आम्ही एफटीआयआयला आशियातील उच्च संस्था म्हणून नावारूपाला आणले असते.  -डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते------------------------------------------------------------आधुनिक भारतीय रंगभूमीवर विजय तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकार आणि गिरीश कार्नाड हे चार नाटककार झाले. या चौघांमध्ये गिरीश ककार्नाड यांनाच केवळ  ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मात्र हा पुरस्कार तेंडुलकर यांना मिळायला हवा होता इतका मोठेपणा त्यांनी दाखविला होता. पाश्चात्यांच्या प्रभावाखाली भारतीय रंगभूमी होती. परंतु भारतीय लोककलांचा उपयोग आधुनिक सामाजिक जाणिवा व्यक्त करण्याकरिता होईल का? याचा अविरत शोध त्यांनी आपल्या नाटकांमधून घेतला. टिपू सुलतानाचं स्वप्नह्ण या नाटकावरून त्यांचा कर्नाटकमध्ये निषेध झाला होता. पेशवेकालीन तो मोठा नायक होता. पण इतिहासकारांनी नेहमी त्यांना खलनायकच ठरविले.मला  टिपू सुलतान जसा दिसला तसा मांडला पण कर्नाड यांचे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजाने मान्य केले नाही. त्यामुळे कर्नाड यांनाही एक पाऊल मागे घ्यावे लागले. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. भारतीय रंगभूमीवरील आज चौथा स्तंभ देखील निखळला- माधव वझे, ज्येष्ठ नाट्य अभ्यासक----------------------------------------------------------स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या मूळाचा शोध घेणारे (गोईंग टू द रूट्स) विजय तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकार आणि गिरीश कर्नाड हे चार नाटककार भारतीय रंगभूमीचे आधारस्तंभ होते. गिरीश कार्नाड यांच्या रूपाने यातील चौथा आणि अखेरचा आधारस्तंभ निखळून पडला. इतिहासाचे व्यापक आकलन  त्यांनी आपल्या नाटकांतून मांडले.  त्यांचे तुघलक  नाटक हे तर भारतीय रंगभूमीवरील कळसाध्याय असेच म्हणावे लागेल. वेगवेगळ्या प्रश्नांसदर्भात त्यांनी त्यांची रोखठोक मते मांडली आहेत.   कांडू , चेलूवी  आणि   उत्सव या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्यातील समृद्ध अभिनेता आपण अनुभवला. कलाकाराने राजकीय भूमिका घेतली पाहिजे या मताचे ते होते. ही भूमिका त्यांनी सातत्याने घेतली असल्याचे दिसून येते. गिरीश कर्नाड यांच्याकडे कन्नड आणि मराठी या भाषांमधील सेतू म्हणून पाहिले पाहिजे- अतुल पेठे, नाटककार .............................. लेखक आणि माणूस म्हणून गिरीश कर्नाड खूप मोठे होते. त्यांच्या नाटकातून काम करण्याची संधी मला मिळाली आणि या निमित्ताने त्यांचा थोडाबहुत सहवास लाभला हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. दिल्ली येथे राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये (नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा) शिकत असताना कार्नाड यांच्या  तुघलक  या नाटकाचे हिंदी आणि उर्दू प्रयोग मी केले होते. अगदी पुराना किला भागातही या नाटकाचे प्रयोग झाले होते. नाटककार म्हणून ही माझी त्यांच्याशी झालेली पहिली ओळख होती. वदन , ययाती , बिखरे बंब  या नाटकांतून त्यांनी माणूसपणाच्या विविध कंगोºयांचा वेध घेतला आहे. काही कारणांनी माझी आणि कर्नाड यांची भेट होत असे तेव्हा त्यांच्यातील विनम्र माणूस मला भावला.- ज्योती सुभाष , ज्येष्ठ अभिनेत्री -----------------------------------------------------------गिरीश कर्नाड यांची दृष्टी अतिशय समृद्ध होती. त्रिकालाबाधित अस्तित्वविषयक तत्वचिंतन आणि समकालीन सामाजिक, राजकीय तानेबाने एकाच वेळी बघू शकणारी एक विलक्षण ताकद त्यांच्या दृष्टीत होती. पुण्यात एका कार्यक्रमात त्यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो. कार्यक्रमापूर्वी आम्ही काही वेळ भेटलो . त्यांना माज्या पुस्तकातला एक विलक्षण विचार आवडला होता. एखादी नवीन कल्पना डोक्यात आली की एखाद्या तरूणाला लाजवेल असा उत्साह  त्यांच्यात संचारायचा. त्या पुस्तकात मी ब्रिटीश अंगाने भारतीय नवरसाची मांडणी करण्याची इच्छा आहे असा विचार मांडला होता. ती मांडणी कशा पद्धतीने करायची असे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू झाले होते- मकरंद साठे, नाटककार------------------------------------------------------------

-- 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यcinemaसिनेमाTheatreनाटकGirish Karnadगिरिश कर्नाड