शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

योजनांपासून आदिवासी वंचित

By admin | Updated: June 13, 2015 23:41 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव (ता. आंबेगाव) हे मावळ तालुक्यापासून ८० किलोमीटर दूर असल्याने या तालुक्यातील आदिवासी लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत.

वडगाव मावळ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव (ता. आंबेगाव) हे मावळ तालुक्यापासून ८० किलोमीटर दूर असल्याने या तालुक्यातील आदिवासी लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. मावळ तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव या चार तालुक्यांचे कार्यालय घोडेगाव येथे आहे. मावळ तालुक्यापासून हे कार्यालय ८० किलोमीटर दूर आहे. मावळ तालुक्यात सुमारे ३५ टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची असून, हा समाज डोंगर-दऱ्यांत वास्तव्य करत आहे. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून ठक्कर बापा योजनांतर्गत पाणी, रस्ते, पथदिवे व मूलभूत सुविधा दिल्या जातात. आदिवासी नागरिकांना जातीच्या दाखल्यासाठी या कार्यालयात धाव घ्यावी लागते.अशिक्षित व आर्थिक मागास आदिवासी समाजातील व्यक्ती मासेमारी, जंगलातील फळे गोळा करणे, शेतमजूर व इतर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. आदिवासींना विविध दाखले व शासकीय योजनांसाठी घोडेगावला जावे लागते. अनेक वेळा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयात भेट होत नाही. यामुळे तालुक्यातील आदिवासींचा वेळ व पैसा वाया जात असल्याने नागरिक या कार्यालयाकडे पाठ फिरवत आहेत.अनेक आदिवासींचा शासकीय योजनांपासून वंचित असल्याने विकास झाला नाही. अनेक आदिवासी कुटुंबांकडे जातीचे दाखले नसल्याने त्यांना योजनांचा लाभ मिळत नाही, तर काही कुटुंबांची आर्थिक कुवत नसल्याने घोडेगावला जाणे शक्य होत नाही. अनेकांना या कार्यालयाचीच माहिती नाही. मावळ तहसील कार्यालयात प्रकल्प कार्यालयाचे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अतीश परदेशी, मधू कोकाटे, सविता पिचड, अनिल गोडे व नागरिकांनी केली. (वार्ताहर)