तांदूळ आणि डाळींमधून साकारला भारताचा तिरंगी नकाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:11+5:302021-02-05T05:17:11+5:30

ग्राहक पेठेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेच्या प्रवेशद्वारामध्ये भारताचा तिरंगी नकाशा साकारला. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक ...

Triangular map of India made from rice and pulses | तांदूळ आणि डाळींमधून साकारला भारताचा तिरंगी नकाशा

तांदूळ आणि डाळींमधून साकारला भारताचा तिरंगी नकाशा

ग्राहक पेठेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेच्या प्रवेशद्वारामध्ये भारताचा तिरंगी नकाशा साकारला. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, उदय जोशी, भीमाशंकर मेरु, विनायक पवार, उपेंद्र चिंचळकर उपस्थित होते. सदाशिव पेठेतील कलातीर्थ संस्थेचे अमोल काळे व सहका-यांनी ही कलाकृती साकारली आहे. याकरीता ५ किलो तांदूळ, ५ किलो मसूरडाळ, ५ किलो हिरवेमूग वापरले आहेत.

सूर्यकांत पाठक म्हणाले, ‘वर्षभर विविध प्रकारचे तांदूळ, डाळी ग्राहकांना उपलब्ध करुन दिले जातात. जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदा आम्ही तांदूळ, डाळींच्या माध्यमातून भारताचा नकाशा साकारला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना सुख-समृद्धी मिळो, यासाठी उपक्रम राबवला. सलग दोन दिवस ही कलाकृती पुणेकरांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.’

Web Title: Triangular map of India made from rice and pulses