शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तीन ‘ऋषिकेश’ची जबरदस्त कामगिरी ; साडेतेरा लाखांची जबरी चोरी करणाऱ्यांना घडली तुरुंगवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 22:19 IST

भर रस्त्यात जबरी चोरी करुन साडेतेरा लाख रुपयांची रोकड चोरुन नेणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश

पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट ६ मधील पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे आणि ऋषिकेश टिळेकर यांच्या प्रयत्नांनी भर रस्त्यात जबरी चोरी करुन साडेतेरा लाख रुपयांची रोकड चोरुन नेणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. 

लोणीकंद येथे भररस्त्यात साडे तेरा लाखांची बॅग चोरुन नेणार्‍या सराईत गुन्हेगार इशाप्पा पंदी याने केल्याची व तो केसनंद फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांनी मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय १९, रा. यशवंतनगर, वाघोली) याला पकडले. त्याच्या मदतीने त्याचा साथीदार प्रदीप ऊर्फ बाबु यशवंत कोंढाळकर (वय २३, रा. केसनंद) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते ओंकार गुंजाळ, विजय राठोड व गणेश काळे या साथीदारांच्या मदतीने गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. ते गुन्हा केल्यानंतर त्यांच्याकडील सीमकार्ड बदलून नवीन सीमकार्ड घेत असत. ऋषिकेश टिळेकर यांनी आरोपी वापरत असलेल्या नवीन सिमकार्डबाबतची माहिती मिळवली. तसेच ते तिघे दुसरा गुन्हा करण्याची योजना करण्यासाठी केसनंद येथे येणार असल्याची माहिती मिळविली. या माहितीवरुन पोलिसांनी ओंकार शंकर गुंजाळ (वय २४, रा. लोणीकंद), गणेश रामदास काळे (वय ३२, रा. वाघोली) आणि विजय नंदू राठोड (वय २२, रा. वाघोली) यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी तसेच मोबाईल फोन जप्त केले. चोरी केलेल्या पैशांमधून त्यांनी कपडे, फ्रिज, शेगडी, मोबाईल, ब्ल्युटुथ हेडफोन खरेदी केले होते. तो सर्व माल पोलिसांनी जप्त केला.  इशाप्पा पंदी व ओंकार गुंजाळ यांच्याविरुद्ध अहमदनगरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

पोलीस निरीक्षक गणेश माने यांच मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकThiefचोरMONEYपैसाjailतुरुंग