शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या सीटमुळे प्रवाशाची पॅंट फाटली, पुणे पोलिसांत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 12:46 IST

बसमधून प्रवास करताना खराब सीटमुळे पँट फाटल्याने पोलिसांत तक्रार केल्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) बसमधून प्रवास करताना बसमधील बाहेर आलेल्या धातूच्या पट्टीमुळे पँट फाटल्याने एका प्रवाशाने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

पुणे : बसमधून प्रवास करताना खराब सीटमुळे पँट फाटल्याने पोलिसांत तक्रार केल्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) बसमधून प्रवास करताना बसमधील बाहेर आलेल्या धातूच्या पट्टीमुळे पँट फाटल्याने एका प्रवाशाने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पीएमपी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करून नुकसानीची भरपाई देण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. संजय लक्ष्मण शितोळे (रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा दरम्यान घडली. सातारा रस्त्यावरील पद्मावती ते कात्रज दरम्यान शितोळे प्रवास करीत होते. बसमधून उतरत असताना बसच्या हँडरेस्टच्या बाहेर आलेल्या लोखंडी पट्टीमुळे पँट फाटली. यामुळे इजा झाली नसली तरी माझे नुकसान झाले. मी बसचा नियमित प्रवासी असून, पासधारक आहे. पीएमपी प्रशासनाने योग्य ती दक्षता न घेतल्याने माझे १ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच या बसमध्ये फर्स्टएड बॉक्स, अग्निशमन सिलिंडर आढळून आले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल