प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीला केले आत्महत्येस प्रवृत्त; चुलत मामाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 14:31 IST2021-03-22T14:30:25+5:302021-03-22T14:31:56+5:30
हडपसरमधील धक्कादायक घटना..

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीला केले आत्महत्येस प्रवृत्त; चुलत मामाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर झालेल्या वादातून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हडपसरमधील हिंगणे मळा येथील बाळासाहेब गवळी बिल्डिंगमध्ये रविवारी सकाळी ६ वाजता घडली. ज्योती कैलास जगताप (वय १८) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
याप्रकरणी अक्षय कैलास जगताप (वय २२, रा. हिंगणे मळा, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी किरण भाऊ शिंदे (रा. वैदुवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय जगताप यांचा चुलत मामाचा मुलगा किरण याने ज्योती जगताप हिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिला तो बोलण्यासाठी व भेटण्यासाठी वारंवार बोलावून त्रास देत होता. त्याच्या या छळवणुकीला कंटाळून ज्योती हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ६ वाजता ज्योतीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.