शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

साहेब, तुम्ही गुन्हा केलाय : तृतीयपंथी दिशा शेख यांचे नितीन गडकरींना खरमरीत पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 8:07 PM

एकवेळ हिजड्यासोबत लग्न केलं तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन योजना  पूर्ण होणार नाही या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानावर अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे : एकवेळ हिजड्यासोबत लग्न केलं तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन योजना  पूर्ण होणार नाही या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानावर अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गडकरी यांनी केलेले हे विधान अविचारी असल्याचे मत विरोधक व्यक्त करत असताना तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांनी थेट गडकरी यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.                    सांगलीतील शेतकरी मेळाव्यात टेंभू सिंचन योजनेसंदर्भात बोलताना गडकरी यांची जीभ घसरली होती. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले की, ' होती. एक वेळ हिजड्याशी लग्न केलं तर मुलं होतील, पण सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही. भाजप सरकारच्या काळात ते पूर्ण झाले. येथील शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं.  यांसारख्या अनेक योजना भाजप सरकारच्या काळात पूर्ण झाल्या, असा हवालाही द्यायला ते विसरले नाहीत.त्यांच्या या विधानावर तृतीयपंथी व्यक्ती आणि संघटना चांगल्याच नाराज झाल्या असून सोशल मीडियावरून माफीची मागणी पुढे येत आहे. याच विषयावर दिशा पिंकी शेख यांनी लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे आहे. 

प्रतिआदरणीय #नितीनगडकरीसाहेब

विषय :- "हिजड्यांनी लग्न केली तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही" ह्या तुमच्या विधानाचा निषेध नोंदवणे बाबत...

महोदय,जय भीम, जय भारतसर्व प्रथम एक भारतीय नागरिक आणि मतदार म्हणून आपणास सांगू इच्छिते कि, आपण भारतात राहतो आणि ह्या देशाचं संविधान इथल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने स्वतःच्या ओळखी सोबत जगण्याचा अधिकार देत, आणि हा सन्मान जर कुणी हिरावून घेत, एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा उपहास करत असेल तर तो त्या व्यक्तीचा किंवा त्या समूहाचा नाही, तर या देशाच्या संविधानाचा उपहास आणि अनादर आहे. आणि तुम्ही हा गुन्हा केलायत. लोक प्रतिनिधी म्हणून सगळ्या समाजांचा आदर करण आणि त्यांना सामाजिक सन्मान बहाल करणं हे तुमच कर्तव्य आहे. जात, वर्ग, लिंग भेदावर आधारलेल्या इथल्या पितृसत्ताक शोषणाच्या बळी पडलेल्या आपल्या समाज व्यवस्थेला या शोषणातून वर काढणं लोकप्रतिनिधींची जवाबदारी आहे. त्याचसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. हिजडा समाजाच्या अस्तित्वाचा त्यांच्यात असलेल्या मातृत्वाचा असल्या घाणेरड्या पद्धतीने उपहास म्हणून वापरणे तुम्हाला शोभले नाही. एखाद्या शारीरिक मानसिक अपंगत्व असलेल्या, सामाजिक स्थरात मागासलेल्या समुदायाचा असा उपहास म्हणून वापर करण त्या समूहाचा अपमान आहे .खरं तर ह्या अपमानाच्या विरोधात तुमच्यावर हिजडा समूहाने मानहानीचा दावा करायला पाहिजे, पण ह्या देशात तुमच्यासारख्या नेतृत्वामुळे स्वातंत्र्याच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतरही माझ्या समूहाच्या भुकेचे प्रश्न सुटलेले नाहीत. म्हणून माझ्या भगिनी तुमच्यासारख्यांकडून होणाऱ्या अपमानजनक वागणुकीलाही आपलं नशीब समजून भोगताना आणि जमाजीक अवहेलनेला सामोरे जातात...पण मी शिवाजी महाराज, शाहू ,फुले, आंबेडकरांच्या  महाराष्ट्रातील  'हिजडा' आहे. हो मी हिजडा आहे. त्यात अपमान वाटण्यासारखा काही नाही.उलट हिजडा समाजाचा गौरवशाली इतिहास तुमच्यासारख्यांनी इतिहासातून गायब केलाय, आणि त्याच इतिहासाची मी वारसदार आहे. म्हणून मी तुम्ही जो माझ्या हिजडा समूहाचा त्यांच्या लैगिकतेचा जो उपहास केला त्या कृत्याचा जाहीर निषेध करते, 

#निषेध!#निषेध!#निषेध!

तुम्हाला निषेधाची माझी प्रमाण संवैधानिक भाषा समजेल अशी मी आशा बाळगते, आणि अनावधाने तुम्हाला किंवा तुमच्या समर्थक महानपुरुषी व्यक्ती कार्यकर्त्यांना माझं हे पत्र मिळालं तर त्यांनी ते तुम्हाला पोचवावं ही भोळी आशा बाळगते. हे पत्र तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही माफी मागाल किंवा नाही हे तुमच्यावर झालेल्या संस्काराचे दर्शन असेल.. किमान परत कधी तुम्ही माझ्या आणि याचं भारताच्या समाजाचा भाग असलेल्या हिजडा समुदायाचा आदर कराल अशी भाबडी आशा बाळगते 

धन्यवाद.

आपली मतदार या नात्याने मालकदिशा पिंकी शेख 

मु.पो:- श्रीरामपूर, जिल्हा:- अहमदनगर, ता:-श्रीरामपूर

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीTransgenderट्रान्सजेंडरSangliसांगलीBJPभाजपा