बदल्यांचा धडाका सुरूच..! पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 04:57 PM2020-08-04T16:57:51+5:302020-08-04T17:02:46+5:30

नवल किशोर राम यांच्या कामाची केंद्राकडून दखल

Transfer continues! Transfer of Pune District Collector Naval Kishor Ram | बदल्यांचा धडाका सुरूच..! पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली

बदल्यांचा धडाका सुरूच..! पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली

Next
ठळक मुद्देनवीन जिल्हाधिकाऱ्याची घोषणा लवकरच

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात तसेच पुण्यात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. पुुण्यात याआधी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून  नियुक्ती करण्यात आली आहे. राम यांच्यानंतर पुण्याचा नवीन उत्तराधिकारी कोण याची घोषणा आज संध्याकाळपर्यंत करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा नवीन अधिकाऱ्यावर निश्चित दबाव असणंर आहे. परंतु, पुणेकरांच्या नवीन जिल्हाधिकारी कोण याविषयी  उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोरोनाकाळात नवल किशोर राम यांनी जोखीम पत्करून काही निर्णय घेत पुण्यातील परिस्थिती उत्तमपणे हाताळली होती. आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांची उत्तम सांगड घालत ही जबाबदारी सक्षमपणे व यशस्वीपणे पार पाडली होती.  त्यांच्या  याच चांगल्या कामाची दखल आता थेट केंद्र सरकारकडून घेण्यात आली असून त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातुन केंद्र सरकारच्या कार्यालयात नियुक्ती झालेले राम हे आत्तापर्यंतचे पुण्यातील तिसरे अधिकारी ठरले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Transfer continues! Transfer of Pune District Collector Naval Kishor Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.