शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

विद्यार्थ्याच्या पॉकेटमनी व कल्पकतेतून साकारलेला ट्रेन मॉडेल देखावा प्रेक्षकांच्या पसंतीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 8:35 PM

इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विशीतील विद्यार्थ्याने पालकांकडून मिळालेल्या पॉकेटमनी व अप्रतिम कल्पकतेतून साकारला आहे

ठळक मुद्देस्वंयचलित यंत्रणेच्या सहाय्याने ट्रेन व हॉर्न यांचा ध्वनी

धनकवडी : विविध प्रकारच्या आकर्षक मोटार गाड्या, ट्रेन, रेल्वे यार्ड, दूध डेअरी, गाईंचा गोठा, आदींची आकर्षक सजावट आणि स्टेशन असलेला ट्रेन मॉडेल हा कात्रज डेअरीने सादर केलेला हालता देखावा गणेश भक्तांच्या पसंतीस उतरत आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरी आवारामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याची निर्मिती इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विशीतील विद्यार्थ्याने पालकांकडून मिळालेल्या पॉकेटमनी व अप्रतिम कल्पकतेतून साकारला आहे. नचिकेत राजगुरव असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने साकारलेला देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली आहे. भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या या देखाव्याविषयी बोलताना नचिकेत म्हणाला, मला लहानपणापासून दिवाळीत किल्ला तयार करणे, घरच्या गणपती पुढे आरास करणे याची आवड होती. मी सहावीत असताना माझ्या पाहण्यात दिवाळीतील किल्ल्यापुढे बॅटरीवर चालणारी रेल्वे आली. त्या रेल्वेसाठी बाहेरुन साऊंडच्या सहाय्याने आवाज दिला होता. दरवर्षी गणपती आले की, माझ्या डोळ्यासमोर हा देखावा उभा राहायचा. मी सर्वसामान्य कुटुंबातून आल्याने खर्चिक असलेली हा देखावा बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे बनवू शकत नव्हतो. मी दहावी उत्तीर्ण झालेनंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या डिग्रीचे शिक्षण सुरु केले. या कालावधीत वेगवेगळ्या गाड्या, बस, ट्रेन, सजावटीसाठी लागणारे वेगवेगळे साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जमा केले. मागील तीन वर्षांपासून मी अशा प्रकारचा देखावा सादर करत आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरुन मोबाईलद्वारे वाय-फाय च्या सहाय्याने ट्रेन मॉडेलिंग मधील गाड्या धावत असतात. यामध्ये स्वंयचलित यंत्रणेच्या सहाय्याने ट्रेन व हॉर्न यांचा ध्वनी येत असतो. त्यामुळे पाहणाऱ्या प्रत्यक्ष ट्रेन चालू असल्याचे दिसून येते व लाईव्ह आनंद घेता येतो. या देखाव्यासाठी आतापर्यंत सुमारे तीन लाख रुपये खर्च आलेला असून मी माझा पॉकेटमनी वाचवून साठविलेले पैसे तसेच माझी आवड पाहून माझ्या वडिलांनी मला दिलेल्या पैशामधून मी टप्प्या टप्प्याने हा खर्च केलेला आहे. या देखाव्याची संपूर्ण कल्पना नचिकेत याची असून सजावटीसाठी कुमार मारणे, दीपक शर्मा, कुणाल दुधाने, केतन मुजुमले, विजय लोणकर, मिनाज मणियार, नेहा शिंदे, प्राची कदम यांनी साहाय्य केले आहे. 

टॅग्स :DhankawadiधनकवडीGanpati Festivalगणेशोत्सवkatrajकात्रजStudentविद्यार्थी