शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:14 IST

मुलगा आईबरोबर नदीवर कपडे धुवायला गेल्यावर खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली

ओतूर : जुन्नर तालुक्यात ओतूर येथे ८ वर्षीय मुलगा सार्थक शिंदे मांडवी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पडून वाहून गेल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेने ओतूरमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.        अधिक माहिती अशी की, ओतूर ता.जुन्नर येथील मांडवी नदी केटी बंधारा येथे मंगळवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी ३.३० च्या सुमारास सानिका अमोल कोकाटे ही कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी सार्थक गोरख शिंदे (वय ८) रा. ओतूर ता. जुन्नर जि. पुणे हा देखील मावशी बरोबर आला होता. सार्थक यावेळी तिथे असलेल्या मुला सोबत खेळत होता. काही वेळानंतर सायंकाळी ५. ३० दरम्यान सार्थक शिंदे हा दिसत नसल्याने त्याची मावशी सानिका कोकाटे यांनी शोधा शोध केली. तर सार्थक कुठे आढळून आला नाही. नंतर घरी फोन करून विचारले की सार्थक घरी आहे का? तर ते नाही म्हणाले. त्यानंतर सर्व जण बेपत्ता झालेल्या सार्थकचा शोध घेण्यासाठी नदीवर आले. त्याठिकाणी सार्थकची चप्पल नदीच्या काठावर आढळून आली. त्यावेळी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचा त्यांना संशय आला. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक यांनी शोधाशोध करत ओतूर पोलिसांना कळवले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिसांनी व ग्रामस्थांनी मांडवी नदी प्रवाहात शोधा घेतला. दुसऱ्या दिवशी बुधवार दि. २३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान नगर कल्याण महामार्गाच्या पुलाच्या खाली मांडवी नदी पात्रात वाहत्या पाण्यात सार्थक शिंदेचा मृतदेह आढळून आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून यामुळे ओतूर व परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरriverनदीDeathमृत्यूPoliceपोलिस