शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

हॉर्न नॉट ओके प्लीज : ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर भरणार खटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 21:12 IST

शांतता क्षेत्रासह अन्य ठिकाणी जोरजोरात हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न बसविणे, आवाज करणारे सायलेंसर वापरणे तसेच वाहनांद्वारे विविधप्रकारे होणारे ध्वनीप्रदुषण आता चालकांना महागात पडणार आहे.

पुणे : शांतता क्षेत्रासह अन्य ठिकाणी जोरजोरात हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न बसविणे, आवाज करणारे सायलेंसर वापरणे तसेच वाहनांद्वारे विविधप्रकारे होणारे ध्वनीप्रदुषण आता चालकांना महागात पडणार आहे. परिवहन विभाग तसेच वाहतुक पोलिसांकडून असे ध्वनीप्रदुषण करणाऱ्या वाहनचालकांवर थेट न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.त्यामुळे वाहनचालकांनी नागरीकांना त्रास होईल अशा पध्दतीने विनाकारण मोठ्या आवाजात हॉर्न वाजवू नये, असे आवाहन दोन्ही विभागांकडून करण्यात आले आहे.

            रस्ते अपघातासोबतच वाहनांद्वारे होणारे ध्वनीप्रदुषण ही एक सामाजिक समस्या बनली आहे. यापार्श्वभुमीवर परिवहन विभाग व वाहतुक पोलिसांकडून पुणे जिल्ह्यात दि. १२ सप्टेंबर रोजी ‘नो हॉर्न डे’ घोषित करण्यात आला आहे. यादिवशी वाहनचालकांनी रस्त्यावर आल्यानंतर एकदाही हॉर्न न वाजवता हा दिवस साजरा करावा, अशी या दिवसाची संकल्पना आहे.वाहतुक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या उपक्रमामध्ये सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, एसटी महामंडळ, पीएमपी, वाहतुकदार संघटना यांसह सामाजिक संस्थांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. याअंतर्गत हॉर्न वाजवविण्याचे दुष्परिणाम व हॉर्न न वाजवता वाहन चालविण्याचे महत्व याबाबत प्रबोधन केले जाणार आहे.

          विनाकारण हॉन वाजविण्याचे प्रमाण सुमारे ८० टक्के असल्याचे सांगत आजरी म्हणाले, पुण्यामध्ये पहिल्यांदाच ‘नो हॉर्न डे’ ही संकल्पना राबविली जाणार जात आहे. वाहनचालकांनी स्वत:हून या मोहिमेत सहभागी व्हायला हवे. दंडात्मक करावाई तर यापुढेही सुरूच राहणार आहे. याबाबत हॉर्न विक्रेत्यांची बैठक घेऊ़न त्यांना मोठ्या आवाजातील, बेकायदेशीर हॉर्न विक्री न करण्याची ताकीद देण्यात आली आहे. त्यांचे परवानेही रद्द होऊ शकतात.  

        सातपुते म्हणाल्या, काही वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवितात. पेठांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना या मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. याबाबत तक्रारीही आल्या आहेत. वाहतुक पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. केवळ दंड न आकारता वाहनाचा हॉर्न काढून घेतला जातो. हा हॉर्न ज्या दुकानदाराकडून घेतला त्यांनाही नोटीस पाठवून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यापुढील काळात कारवाईचे प्रमाण वाढविले जाईल. त्यासोबत आता जनजागृतीही केली जाणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने या मोहिमेत सहभागी व्हावे.

दिवसभरात एक कोटीवेळा वाजतो हॉर्न

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे दि. ३१ जुलैपर्यंत ३७ लाख १६ हजार ६९९, पिंपरी चिंचवड कार्यालयाकडे १७ लाख ७० हजार ७८४ तर बारामती कार्यालयाकडे ३ लाख ८५ हजार ४०८ वाहनांची नोंद आहे. पुणे जिल्ह्याची एकुण वाहनसंख्या ५८ लाख ७२ हजार ८९१ एवढी आहे. या वाहनांपैकी किमान २५ टक्के वाहनांचा दैनंदिन वापर होतो. प्रत्येक वाहनचालक किमान ५ ते १० वेळा हॉर्नचा वापर करतो. केवळ पुणे शहराचा विचार केल्यास दिवसभरात किमान एक कोटीवेळा हॉर्न वाजिवला जातो, अशी माहिती आजरी यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसpollutionप्रदूषणRto officeआरटीओ ऑफीस