तीन पीएमपी बसेसमुळे लागल्या वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 04:16 PM2019-06-02T16:16:01+5:302019-06-02T16:17:02+5:30

रविवार दुपारी दोन वाजता सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडीतील लोखंडी पादचारी पूल परिसरात पाठोपाठ तीन पीएमपी बस बंद पडल्याने वाहनकाेंडी झाली हाेती.

traffic jam on satara road due to break down of three pmpml buses | तीन पीएमपी बसेसमुळे लागल्या वाहनांच्या रांगा

तीन पीएमपी बसेसमुळे लागल्या वाहनांच्या रांगा

Next

धनकवडी : रविवार दुपारी दोन वाजता  सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडीतील लोखंडी पादचारी पूल परिसरात पाठोपाठ तीन  पीएमपी बस बंद पडल्याने वाहनकाेंडी झाली हाेती. साधारण तासभर या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतुक काेंडीत अडकून पडावे लागले. 

पद्मावती पुला पासून सुरू होणारा चढणमार्ग अहिल्यादेवी चौकापासून पुढे भारती विद्यापीठ पर्यंत तिव्र होत जातो, उन्हात इंजीन  तापलेल्या जुन्या पीएमपी बस या दरम्यान हमखास बंद पडतात. कात्रज आगार हाकेच्या अंतरावर असूनही ब्रेक डाऊनची सुविधा लवकर उपलब्ध होत नाही. किंवा बस ओढून मार्गातून बाजूला घेण्याची तत्परता सुद्धा दाखवली जात नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत नागरिकांना अडकून पडण्याचा संताजनक प्रसंग वारंवार घडत आहे.  रवीवारी दुपारी दोन वाजता शिवाजीनगर ते कात्रज जाणारी बस ( MH 14 CW 1793 )  बालाजीनगरच्या चढण मार्गात लोखंडी पूलाजवळ क्लचप्लेट गेल्याने बंद पडली. पाठोपाठ MH 12 DT 6497 व DT 12 5162 या दोन गाड्या इंजिन गरम झाल्यामुळे बंद पडल्या. बीआरटी पुर्नरचनेचे सुरू असलेले काम आणि अरूंद झालेला मार्गामुळे वाहनांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण होवून एकच गोंधळ झाला. 

बीआरटी मार्गामध्ये पीएमपीएल बस चे अचानक बंद पडण्याची मालिका चालूच असून नागरिकांना मात्र कडक उन्हात वाहतूक कोंडी चा सामना करावा लागत आहे. ही मालिका थांबणार कधी असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे. अरुंद रस्ता , बिआरटी मार्ग ,  सदगुरू शंकर महाराज उड्डान पुलावरून आणि पुलाखालून येणारी वाहतूक रस्त्यामध्ये बंद पडलेल्या बस मुळे वाहनांच्या रंगा लागल्या होत्या.
 

Web Title: traffic jam on satara road due to break down of three pmpml buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.