शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Video: सिंहगड रोडच्या नव्या उड्डाणपुलावर उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशीच वाहतूककोंडी; ५ मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:39 IST

सिंहगड रोडवरील वाहतूककोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता, मात्र अजूनही परिस्थिती 'जैसे थे' च आहे

पुणे: पुण्यातील सिंहगड रस्ता आणि वाहतूक कोंडी हे वर्षोनुवर्षाचं समीकरण आहे. याच वाहतूक कोंडीतूनपुणेकरांची सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फन टाईम सिनेमा पर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला. मागील कित्येक महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा उड्डाणपूल अखेर पुणेकरांसाठी सुरू करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले. या नवीन उड्डाणपुलाचं उदघाटन झाल्यानंतर अ दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सिंहगड रस्त्यावर नुकताच उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलावर दुसरयाच दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली आहे. त्यामुळे उड्डाणपूल बांधण्याचा हेतू खरंच सफल झाला का? असा प्रश्न आता पुणेकरांना पडलाय. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी या उड्डाणपुलावर वाहनांच्या जवळपास एक किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा पाहायला मिळाल्या आहेत. शहरातला सर्वांत मोठा उड्डाणपूल म्हणून या उड्डाणपुलाची ओळख आहे. अगदी चार ते पाच मिनिटात हा पूल पार करणं शक्य असताना जवळपास अर्धा तास हा पूल प्रवाशांना त्या दिवशी लागला आहे. त्यामुळे उड्डाणपूल बांधला असला तरी परिसरात वाहतूक सुधारणा करणं गरजेचं आहे. असच सध्या तरी दिसून येतंय.

सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी तशी नेहमीचीच आहे. अगदी पंधरा मिनिटाच्या अंतरासाठी प्रवाशांना पाऊण तास एक तास मोजावा लागतो. अशी इथल्या प्रवाशांची कायमच ओरड असते. याठिकाणी उड्डाणपूल बांधणं गरजेचं होतं. त्यामुळेच या उड्डाणपुलाचं काम सुरू असताना सिंहगड नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन केला होता. फन टाईम सिनेमाच्या समोर हा नवीन उड्डाणपूल उतरतोय. आणि त्याच ठिकाणी पुलावरनं येणारी वाहने पुलाच्या खालून येणारी वाहने आणि वडगाव या गावातनं येणारी वाहने एकाच ठिकाणी एकत्रित येतायेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र नवीन उड्डाणपूल सुरू झाल्यानंतरही जर परिस्थिती जैसे थेच असेल तर आता या परिस्थितीवर वाहतूक पोलीस काय नेमका मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसbikeबाईकcarकार