मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी,अमृतांजन पुलाजवळ वाहतूक संथगतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 10:38 IST2018-03-29T09:23:37+5:302018-03-29T10:38:00+5:30

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे

traffic jam on mumbai-pune express way | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी,अमृतांजन पुलाजवळ वाहतूक संथगतीने

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी,अमृतांजन पुलाजवळ वाहतूक संथगतीने

पुणे- सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहतूक संथगतीने सुरू आहे. पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. आजपासून चार दिवस सलग सुट्ट्या आल्याने पर्यटकांचा बाहेर जाण्याकडे कल आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतं आहे. बऱ्याच ठिकाणी गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत

आज महावीर जयंती, उद्या गुड फ्रायडे, परवा पाचवा शनिवार आणि १ एप्रिल रोजी रविवार सुट्टीचा दिवस आल्याने या संधीचा फायदा घेत अनेकांनी बाहेर जाण्याचा मार्ग निवडला आहे. मुंबईतील अनेक पर्यटक या चार दिवसांच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी शहराबाहेर जात आहेत. 

Web Title: traffic jam on mumbai-pune express way