शिवाजीनगर परिसरातील सिमला ऑफिस चौक परिसरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 14:20 IST2024-05-03T14:17:26+5:302024-05-03T14:20:35+5:30

सिमला ऑफिरा चौक आणि परिसरामधील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत...

Traffic changes in Shimla Office Chowk area in Shivajinagar area, what are the alternative routes? | शिवाजीनगर परिसरातील सिमला ऑफिस चौक परिसरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

शिवाजीनगर परिसरातील सिमला ऑफिस चौक परिसरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

पुणे : शिवाजीनगर परिसरातील सिमला ऑफिस चौकाजवळ गर्डर लाँचिंगचे काम करायचे असल्याने वाहतूककोंडी टाळण्यासाठी व वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरामधील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल ४ मे २०२४ पासून पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू असणार आहेत.

वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशीमार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एस.टी. स्टँड मार्ग) हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी करण्यात येणार आहे. वीर चाफेकर उड्डाणपुलावरुन सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहणार आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवरून वीर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकामध्ये जाण्यासाठी प्रवेश बंद असणार आहे. न. ता. वाडी चौक ते चाफेकर चौक प्रवेश बंद राहणार आहे. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून एस. टी. स्टँड सर्कलवरून न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहणार आहे. पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एलआयसीकडील बाजूने चाफेकर उड्डाण पुलाचा वापर करावा.

Web Title: Traffic changes in Shimla Office Chowk area in Shivajinagar area, what are the alternative routes?