रमजान ईदनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 09:59 AM2024-04-11T09:59:31+5:302024-04-11T10:00:41+5:30

ईददिवशी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे...

Traffic changes in Pune city on the occasion of Ramadan Eid, know alternative routes | रमजान ईदनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

रमजान ईदनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : रमजान ईदनिमित्त शहरात आज विविध भागांमध्ये सामूहिक नमाजपठण करून ईद साजरी केली जाणार आहे. ईदगाह मैदानाच्या जवळपास या निमित्त मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. ही वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून तात्पुरत्या स्वरूपात काही बदल करण्यात आले आहेत. आज अथवा उद्या सकाळी सहा ते नमाज पठण पूर्ण होईपर्यंत काही रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

१) गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग नमाज पठणाच्या वेळी बंद राहणार आहे.

२) सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक नमाज पठणाच्या वेळी बंद राहणार आहे.

३) सेव्हन लव्हज चौककडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक बंद राहणार आहे.

४) सोलापूर रोडने मम्मादेवी चौक येथे येणारा वाहतूक ही गोळीबार चौकाकडे जाण्यास बंद राहणार आहे.

५) भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथे बंद राहणार आहे.

६) कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणाऱ्या सर्व जड मालवाहतूक करणारी वाहने, जड प्रवासी बसेस, प्रवासी एसटी बसेस, पीएमपी बसेस यांना प्रवेश बंद राहणार आहे.

कोंढवा वाहतूक विभागांतर्गत करण्यात येणारे बदल...

१) ज्योती हॉटेल चौकातून फकरी हिल्स चौकमार्गे कमेला, साळुंके विहार येथे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात येत आहे.

२) ज्योती हॉटेल चौकातून डावीकडे वळून मेफेअर जंक्शनमार्गे पारगेनगरकडे जाणाऱ्या जड वाहतुकीस ज्योती हॉटेलकडून डावीकडे वळण्यास बंदी करण्यात येत आहे.

३) पारगेनगर येथून मेफेअर जंक्शनमार्गे ज्योती हॉटेलकडे जाणारी जड वाहतूक बंद करण्यात येत आहे.

Web Title: Traffic changes in Pune city on the occasion of Ramadan Eid, know alternative routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.