शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने सत्तेसाठी इतरांचे सरकार पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
2
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
3
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
4
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  
5
पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
7
“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणाच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार
8
"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं
9
T20 World Cup मधील सर्वात तरूण आणि वयस्कर खेळाडू कोण? तब्बल २५ वर्षांचे अंतर
10
प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS
11
Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग
12
Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी
13
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
14
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
15
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
16
अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
18
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?
19
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
20
सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र

नववर्ष स्वागतासाठी डेक्कन, लष्कर भागातील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते वाहनांसाठी बंद

By नितीश गोवंडे | Published: December 30, 2023 6:23 PM

सायंकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल केले आहेत....

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२४ या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने रविवारी (ता. ३१) सायंकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल केले आहेत. मध्यरात्री गर्दी कमी होईपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

लष्कर भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे..वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक इस्ट स्ट्रीटवरुन इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळवण्यात येणार आहेे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे..कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक येथे बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळवण्यात येणार आहे.जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी रस्तामार्गे वळवण्यात येणार आहे.

महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहनांसाठी बंद..लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात रविवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौक दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस