पुणे - मुंबई लोहमार्गावर धावत्या रेल्वेतून पडून व्यापाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 21:45 IST2023-06-13T21:44:27+5:302023-06-13T21:45:02+5:30

तळेगाव दाभाडे ( पुणे ) : पुणे - मुंबई लोहमार्गावर एका अज्ञात रेल्वेगाडीतून पडून एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. विद्याधर ...

Trader dies after falling from running train on Pune-Mumbai railway pune latest news | पुणे - मुंबई लोहमार्गावर धावत्या रेल्वेतून पडून व्यापाऱ्याचा मृत्यू

पुणे - मुंबई लोहमार्गावर धावत्या रेल्वेतून पडून व्यापाऱ्याचा मृत्यू

तळेगाव दाभाडे (पुणे) :पुणे - मुंबई लोहमार्गावर एका अज्ञात रेल्वेगाडीतून पडून एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. विद्याधर विजयकुमार इनामदार (वय ४८, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे - मुंबई लोहमार्गावर तळेगाव दाभाडे व वडगावच्या दरम्यान एमआयडीसी रोडच्या पुलालगत रेल्वे किलोमीटर क्रमांक १५५/५१ जवळ सोमवारी (दि. १२) सायंकाळी ४:३०च्या सुमारास एका अज्ञात रेल्वे गाडीतून पडून विद्याधर इनामदार गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. विद्याधर इनामदार यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच तळेगाव शहरातील राव कॉलनी विभागावर शोककळा पसरली. विद्याधर इनामदार हे तळेगाव दाभाडे रोटरी सिटीचे सदस्य होते. ते मनमिळावू आणि शांत स्वभावाचे होते. ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांचे ते बंधू होत. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे

डॉ. मनोजकुमार चौधरी यांनी शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास रेल्वेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय तोडमल करीत आहेत.

Web Title: Trader dies after falling from running train on Pune-Mumbai railway pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.