दगडाने भरलेला ट्रॅक्टर दरीत कोसळला, दोघांचा मृत्यू ; खेड तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 20:28 IST2020-12-29T20:25:40+5:302020-12-29T20:28:13+5:30
ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर व दगडांनी भरलेली ट्रॉली दरीत कोसळली.

दगडाने भरलेला ट्रॅक्टर दरीत कोसळला, दोघांचा मृत्यू ; खेड तालुक्यातील घटना
राजगुरूनगर: दगडाने भरलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली दरीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी खेड तालुक्यातील आव्हाट येथे घडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास गंगाराम बुरुड (वय २८), दत्तात्रय पुनाजी आढळ (वय ३६, दोघे रा. शेरेवाडी आव्हाट, ता खेड) असे मुत्यू झालेल्यांची नावे आहेत.
आव्हाट येथील दत्तात्रय आढळ यांच्या घराचे काम चालू होते. या कामासाठी दगड आणण्यासाठी त्यांच्याच गावातील सोमनाथ भिकाजी किरवे यांचा ट्रॅक्टर घेऊन घराच्या कामासाठी लागणारे दगड आण्यासाठी ते गोहे (ता. आंबेगाव) येथे गेले होते. गोहे येथून दगड ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत घेऊन येत असताना आव्हाट येथे भगितवाडी (ता.खेड) येथे रस्त्याच्या वळणार ट्रॅक्टर चालक संतोष सोमनाथ किरवे यांच्या ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर व दगडांनी भरलेली ट्रॉली दरीत कोसळली. या अपघातात दत्तात्रय आढळ व विलास बुरुड यांचा या अपघात डोक्याला व पायला गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मुत्यू झाला. ट्रॅक्टर चालक संतोष किरवे यांला गावतील ग्रामस्थांनी त्यांना घोडेगाव येथे रुग्णालयात दाखल केले. त्याच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे.