उरुळी कांचन-जेजुरी राज्यमार्गावरील शिंदवणे घाट माथ्यावरील चारीत ट्रॅक्टर कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 18:56 IST2017-12-19T18:48:59+5:302017-12-19T18:56:52+5:30

वाघापूरनजीक कुंजीरस्थळ येथील पुलावरून ट्रॅक्टर चालकासह चारीत कोसळून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक ठार झाला. ट्रॅक्टरचे दोन-तीन तुकडे झाले आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

tractor fall down from mountain road uruli kanchan, pune; driver dead | उरुळी कांचन-जेजुरी राज्यमार्गावरील शिंदवणे घाट माथ्यावरील चारीत ट्रॅक्टर कोसळून चालक ठार

उरुळी कांचन-जेजुरी राज्यमार्गावरील शिंदवणे घाट माथ्यावरील चारीत ट्रॅक्टर कोसळून चालक ठार

ठळक मुद्देट्रॅक्टरचे झाले दोन-तीन तुकडे, ट्रॅक्टरचालक ठारपंपगृहासमोरील पुलावर वळताना अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर कोसळले सुमारे ४० फूट खोल चारीत

उरुळी कांचन : उरुळी कांचन ते जेजुरी या राज्यमार्गावर असणाऱ्या शिंदवणे घाट माथ्यावरील वाघापूरनजीक कुंजीरस्थळ येथील पुलावरून ट्रॅक्टर चालकासह चारीत कोसळून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक ठार झाला. ट्रॅक्टरचे दोन-तीन तुकडे झाले आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
खंडू शिवाजी गरद (वय ४०, मूळ राहणार लातूर) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. 
शिंदवणे घाटमाथ्यावर पुरंदर उपसाचे क्रमांक ५ पंपगृह आहे. या चारीत पुरंदर उपसाच्या दोन  जलवाहिन्या असून, यापूर्वी हा रेल्वेचा जुना मार्ग होता. वाघापूर येथील शेतकरी रवींद्र दशरथ कुंजीर यांच्या मालकीचा हा ट्रॅक्टर असून, गरद त्यावर चालक म्हणून काम करीत होते. रविवारी सायंकाळी कुंजीरस्थळकडून वाघापूरकडे जात असताना पंपगृहासमोरील पुलावर वळताना अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर सुमारे ४० फूट खोल चारीत कोसळून अपघात झाला. याबाबतची माहिती वाघापूरचे पोलीस पाटील विजय कुंजीर यांनी दिली. 

Web Title: tractor fall down from mountain road uruli kanchan, pune; driver dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.