ट्रॅक्टर व कारच्या धडकेत दोन जण ठार : पातोंडा गावाजवळ घडला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 05:22 PM2017-12-17T17:22:09+5:302017-12-17T17:22:16+5:30

Two people were killed in a tractor and a car accident: Accident happened near Patonga village | ट्रॅक्टर व कारच्या धडकेत दोन जण ठार : पातोंडा गावाजवळ घडला अपघात

ट्रॅक्टर व कारच्या धडकेत दोन जण ठार : पातोंडा गावाजवळ घडला अपघात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव वेगातील कार आणि ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन कारमधील दोन जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी पातोंडानजीक घडली़ धडकेमुळे पेट घेतल्याने कारचा चालक गंभीर भाजला गेला आह़े 
अपघातात उद्धव जांभळे (42), रा.शहादा व लताबाई अशोक होळकर (65) रा.नंदुरबार हे ठार झाले तर अभिजीत जांभळे, स्वाती अभिजीत जांभळे, ट्रॅक्टवरवरील अक्काबाई लुकडय़ा भिल व सुरेखा नितीन कोकणी, रा.नंदुरबार हे जखमी झाले. शहादा येथून जांभळे कुटूंबिय कारने (क्रमांक एमएच 12 एयू 2679) नंदुरबारकडे येत होते. भरधाव कार आणि समोरून येणारे विटांनी भरलेले भरधाव ट्रॅक्टर (एमएच 39 एन. 148) यांच्यात पांतोडा ते कोळदा दरम्यान समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भिषण होती की कारचा चक्काचूर होऊन कारने पेट घेतला. रस्त्यावरील येणा:या-जाणा:या वाहनचालकांनी जखमींना मदतीचा हात दिला. तालुका पोलीस ठाण्याचे पथक लागलीच घटनास्थळी दाखल झाले. जखमींना नंदुरबारातील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. कारने पेट घेतल्यामुळे उद्धव जांभळे हे भाजले गेले. शिवाय गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यात दुपारी चार वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना लताबाई होळकर यांचे निधन झाल़े तर गंभीर जखमी अभिजीत व स्वाती या दोघांना धुळे येथील रूग्णालयात हलवण्यात आल़े 
विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरवर बसलेल्या अक्काबाई लुकडय़ा भिल (40) रा़ नवापूर चौफुली व सुरेखा नितीन कोकणी (35) रा़ कोकणी हिल नंदुरबार या दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुका पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ हजर झाल़े अपघातामुळे दोन्ही बाजूस वाहतूकीची कोंडी झाली होती़ 
 

Web Title: Two people were killed in a tractor and a car accident: Accident happened near Patonga village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.