डोंगरावर पाय घसरल्याने दरीत पडला; विसापूर किल्ल्याकडे जाताना पर्यटकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:22 IST2025-08-02T19:22:25+5:302025-08-02T19:22:46+5:30
विसापूर किल्यावर जाताना भाजे लेणीच्या जवळपास असलेल्या डोंगरावरुन जाणाऱ्या रस्त्यावरुन पाय घसरल्याने दरीत पडून पर्यटकाचा मृत्यू झाला

डोंगरावर पाय घसरल्याने दरीत पडला; विसापूर किल्ल्याकडे जाताना पर्यटकाचा मृत्यू
पवनानगर: विसापूर किल्ल्याकडे पर्यटनासाठी जात असताना भाजे गावाच्या हद्दीमध्ये पाय घसरून एका पर्यटकांचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दि.२ आँगस्ट रोजी विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी घडली. उंचावरून पडल्यामुळे डोक्याला गंभीर मार लागल्याने पर्यटकांचा मृत्यू झाला.
अब्राहम शिंसे (वय.२९) मुळ राहणार प्रिन्स अब्राहम, इदातरा,मोदीयोर कोनम,पी.ओ.पडालम,पटणा तिथा,केराळा सद्या राहणार विमाननगर, पुणे.असे मृत्युमुखी पडलेल्या पर्टकांचे नाव आहे. हा पुण्यात क्रिचन समाजातील फादर चे शिक्षण घेत होता. सकाळी दहा मित्रांसोबत विसापूर किल्यावर फिरण्यासाठी आले होते.यावेळी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते विसापूर किल्यावर जाण्यासाठी निघाले असता भाजे लेणीच्या जवळपास असलेल्या डोंगरावरुन जाणाऱ्या रस्त्यावरुन पाय घसरल्याने दरीत पडून मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. अथक प्रयत्नांनी दरीत पडलेल्या अब्राहम याचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने शोधून काढला. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे.