शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

पर्यटन विकास आराखडा जिल्ह्याचा; पण सर्वांचा स्वतंत्र अजेंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 7:58 PM

अजित पवार म्हणाले, जिल्ह्याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा

पुणेपुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एक, पीएमआरडीएच्या वतीने दुसराच तर अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी तिसराच एवढेच नाही तर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी त्यांना अपेक्षित आराखडा सादर करत प्रत्येकानेे आपल्यानुसार विकास आराखडा तयार केला. प्रत्येकांचे वेगवेगळे आराखडे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा पर्यटन विकास आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सुनिल शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, आमदार दिलीप मोहिते तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने निधी दिला आहे, त्याचे नियोजन करा. पर्यटन स्थळांवर मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करा. पर्यटन विकासासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कार्यशाळा घेऊन तज्ञांचे मार्गदर्शन घ्या असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे आणि ॲड.वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु होणारा हा प्रकल्प स्तुत्य असून त्याबाबतीत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. परंतु काम लोकांच्या सुविधेत भर पाडणारे व दर्जेदार काम असावे.

पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी पार्कींग  व्यवस्था असावी. तसेच पर्यटनाच्या ठिकाणी चुकीचे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. जुन्नर तालुक्याप्रमाणे अन्य तालुके पर्यटनस्थळे घोषित होण्याबाबत प्रयत्न करावेत.  -----जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण नाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ घेऊन जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला, यासाठी काही आमदारांना पण निमंत्रण दिले. पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे यांना मात्र या बैठकी संदर्भात कोणत्याही प्रकारची कल्पनाच देण्यात आली नाही. कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर लगेच जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्या संदर्भात बैठक घेण्यात आली. पण अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण नसल्याने हाॅलमधून बाहेर पडावे लागले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारtourismपर्यटनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड