शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तोतया ACB अधिकाऱ्यांची उपसंचालकाच्या घरी धाड; खऱ्या पोलिसांची एंट्री अन् तोतयांनी ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:26 IST

अधिकाऱ्यांना फोन करण्याचा बहाणा करुन या तोतयाने धूम ठोकली...

पुणे: ईडी, सीबीआयप्रमाणे पहाटेच आम्ही ॲन्टी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगर रचना उपसंचालकाच्या घरात ते शिरले. त्यांच्यावर कारवाईचा बहाणा करीत असताना वारजे पोलिसांची एंट्री झाली. तेव्हा महिला पोलीस उपनिरीक्षकांना आम्हाला कल्पना न देता कसे आलात, असे म्हणत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करण्याचा बहाणा करुन या तोतयाने धूम ठोकली.

याप्रकरणी नगर रचना विभागाचे उपसंचालकांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साध्या वेशातील सावंत व पोलीस गणवेशातील एक पुरुष व महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील दत्त दिगंबर कॉलनीत शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ॲन्टी करप्शनकडून आलो असल्याचे या तोतयाने २३ जून रोजी तुमच्या ऑफिसमध्ये काय झाले याची विचारणा केली. त्यांनी त्यांच्याकडील एका व्हिडिओ दाखवून त्यामध्ये एक इसम झोन दाखल्याबाबत आला होता. त्याबाबत फिर्यादीने आरोपीना माहिती दिली. त्यावर या तोतयाने तुमच्या ऑफिसमधील एकाने झोन दाखल्यासाठी आलेल्याकडे पैशांची मागणी करुन काही रक्कम स्वीकारली. तसेच तुमचे नाव देखील आले आहे. तुम्हाला त्यात अटक करुन तुमची प्रॉपर्टी जप्त करावी लागेल, असे सांगितले.

हे तुम्हाला नको असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे तो तोतया अधिकारी बोलला. याचवेळी वारजे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील तेथे पोहचल्या. त्यांना पाहून या तोतयाने तुम्ही आम्हाला कल्पना न देता या ठिकाणी कसे आलात, तुमच्या सिनिअर पी आयचा नंबर द्या, असे त्यांना म्हणाला. त्यांनी नंबर दिल्यावर त्यांना फोन लावण्याचा बहाणा करुन तो घराबाहेर गेला व तेथून तो पळून गेला.

याबाबत वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले की, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरु असेल तर त्यात हस्तक्षेप केला जात नाही. नाही तर तुमच्यामुळे आमची कारवाई फसली, असे म्हणून संबंधित अधिकार्याला दोष दिला जातो. कर्वेनगरमध्ये कारवाई सुरु असल्याचे समजल्यावर पोलीस अधिकार्यांना पाठविले होते.

पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार ते आपण गेलो होतो. त्यावेळी त्याने आपल्यालाच तुम्ही कशा आलात, असे विचारुन माझ्याकडून सिनिअरांचा नंबर घेतला. त्यावेळी मला सिनिअरांना फोन येत होता. पण तोही घेऊन दिला नाही. सिनिअरांशी बोलण्याचा बहाणा करुन तो घराबाहेर गेला. तेव्हा आम्ही घरातच वाट पहात होतो. काही वेळाने बाहेर येऊन पाहिल्यावर तो पळून गेल्याचे लक्षात आले. वारजे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीkarve nagar policeकर्वे नगर पोलीसWarje Malwadiवारजे माळवाडी