शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

उजनी धरणात तब्बल ३२ टीएमसीचा गाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:14 IST

पुणे शहराला दोन वर्षे पाणी पुरेल इतकी जागा व्यापली गाळाने

- विशाल शिर्के पुणे : बहुतांश मोठी धरणे अक्षरश: गाळात गेल्याने राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात सर्वाधिक साठवणूक क्षमता असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर बांधलेल्या उजनी धरणांत २०११ सालीच तब्बल २७.९४ टक्के गाळाचे प्रमाण असल्याची माहिती हाती आली आहे. त्यानुसार ३२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी साठविण्याची धरणाची क्षमता कमी झाली आहे. गेल्या सहा वर्षांत गाळ साठण्याचे किमान प्रमाण ग्राह्य धरल्यास हा आकडा ४० ते ४२ टीएमसीवर जाऊ शकतो.राज्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने राज्यावर दुष्काळाची छाया आहे. राज्यातील दोनशेहून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक पाऊस पडूनही केवळ पावसात सातत्य नसल्याने पिके वाया गेली आहेत. पावसाळ््यात नदी, नाले तसेच ओढ्यांना येणाऱ्या पुरामुळे धरणक्षेत्रात माती, दगड, गोटे, रेती असे अनेक पदार्थ वाहून येतात. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी होते. दर दहा वर्षांनी धरणातील गाळाचा आढावा घेऊन, अतिरिक्तगाळ काढणे अपेक्षित असते. तसे न झाल्याने धरणाची साठवणूक क्षमता कमी होऊन सिंचन क्षमता देखील कमी झाल्याचे वास्तव समोर आले आहे.सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उजनी धरण बांधण्यात आले असून, १९८० मध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. या धरणाचे स्वत:चे पाणलोट क्षेत्र नाही. मात्र, जिल्ह्यातील जवळपास १८ धरणांतून सोडलेले पाणी पुढे उजनी धरणात जमा होते. या धरणाची प्रकलपीय क्षमता ३ हजार ३३० दशलक्ष घनमीटर (११७.२७ टीएमसी) आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा ५३.५९ आणि मृत साठ्याचे प्रमाण ६३.६८ टीएमसी आहे.नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) २००२ आणि २००७मध्ये गाळाचे सर्वेक्षण करूना दिलेल्या अहवालानुसार उजनी धरणात १२.७७ टक्के इतका गाळ होता. त्यानंतर केंद्रीय जल अयोगाने २०११ मध्ये विशेष तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या पाहणीत उजनीतील गाळाचे प्रमाण २७.९४ टक्क्यांवर गेले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार किमान ३२ टीएमसीने धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे.म्हणजेच २००७ ते २०११ या अवघ्या पाच वर्षांच्या काळात गाळाचे प्रमाण १५.१७ टक्क्यांनी वाढल्याचे निष्पन्न झाले. गेल्या आठ वर्षांत केवळ त्याच्या निम्मा गाळ असल्याचे गृहीत धरले तरी टक्केवारी ३५ होईल. तसेच, गाळामुळे ४० ते ४२ टीएमसी इतकी धरणाची पाणी सावणूक क्षमताही कमी होईल. पुणे शहराची पाण्याची गरज पाहता ३२ ते ४२ टीएमसी पाणी शहराला पावणेतीन ते तीन वर्षे पुरेल.पाच धरणांतील गाळ काढण्याचे काम गुलदस्तातराज्य सरकारने २०१७मध्ये सोलापूर जिल्ह्यातील उजनी, नाशिकचे गिरणा (२१.४७ टीएमसी), भंडाºयाचे गोसीखुर्द (१९.६७ टीएमसी), औरंगाबादचे जायकवाडी (१०२.७१ टीएमसी) आणि अहमदनगरमधील मुळा (२५.९९ टीएमसी) या धरणातील गाळ आणि रेती काढण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेतला होता. या अनुभवावरुन राज्यातील इतर धरणातील गाळ काढण्याचे धोरण होते. मात्र, त्यावर पुढे फारसे काम झाले नसल्याचे समजते.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईPuneपुणे