बदनामीची धमकी देऊन माजी नगरसेविकेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2023 10:20 IST2023-10-04T10:20:20+5:302023-10-04T10:20:31+5:30
सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. सारडा कॉलनी, संतोषनगर, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली

बदनामीची धमकी देऊन माजी नगरसेविकेवर अत्याचार
पुणे : व्हिडीओ व फोटो व्हायरल करून समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन माजी नगरसेविकेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. सारडा कॉलनी, संतोषनगर, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हा प्रकार २०१७ पासून सुरू होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन काकडे याने मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने या महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सचिन काकडे हा फिर्यादीच्या घरी येऊन तू दुसरे लग्न केले आहेत. तुझ्यामुळे माझी बायको व मुले मला सोडून गेली, असे म्हणून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी सचिन काकडे याला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन निकाळजे तपास करीत आहेत.