शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड्स’चे आज दिमाखदार वितरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 3:04 AM

विविध १३ क्षेत्रांत होणार निवड; मान्यवरांच्या उपस्थितीत गावकारभाऱ्यांचा सन्मान

पुणे : गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या गावकारभाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित ‘लोकमत सरपंच अवार्ड्स’ पुरस्काराची प्रतीक्षा आज संपणार आहे. १३ विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाºया सरपंचांची निवड तज्ज्ञ ज्यूरींनी केली असून, सोमवारी येरवडा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित दिमाखदार सोहळ्यात उद्या (दि. ११) या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.ग्रामीण अर्थव्यवस्था ही देशाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गाडा गावाचे कारभारी सरपंच चालवित असतात. गावाच्या विकासासाठी झटणाºया या सरपंचांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे गेल्या वर्षीपासून ‘लोकमत सरपंच अवार्ड्स’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाला जिल्ह्यातील सरपंचांनी उदंड प्रतिसाद दिला. याही वर्षी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. जवळपास १३ विविध क्षेत्रांतून जिल्ह्यातील सरपंचांनी या पुरस्कारासाठी त्यांचे अर्ज लोकमत कार्यालयात पाठविले होते.सर्व अर्जांची तज्ज्ञ परीक्षकांकडून छाननी करण्यात आली आहे. नॅशनल फेडरेशन फॉर अर्बन बँक्स अँड के्रडिट सोसायटीचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि राज्याचे माजी कृषी आयुक्तउमाकांत दांगट या तज्ज्ञांनी सर्व अर्जांची बारकाईने पाहणी केली.आलेल्या सर्व अर्जांतून उत्कृष्ट अशा १३ जणांची निवड करण्यात आली असून, सोमवारी होणाºया दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना ‘लोकमत सरपंच अवार्ड्स’ या कार्यक्रमाचे मुुख्य प्रायोजक हे बीकेटी टायर्स, तर पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाºया व त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी झटणाºया मेहनती व कर्तबगार विजेत्या सरपंचांना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ काँगे्रस नेते उल्हास पवार, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, बीकेटी टायर्स अ‍ॅग्री सेल्सचे राज्याचे प्रमुख झुबेर शेख, डिस्ट्रिब्युटर कंवरजित सिंग बंगा यांच्या हस्ते सन्मानित करण्यातयेणार आहे.पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकषजलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरणसंवर्धन, प्रशासन /ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर या १३ क्षेत्रांत हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचांनी केलेले काम पाहून, त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जाणार आहेत.पुरस्कार प्रदान सोहळासोमवार, दि. ११ मार्च २0१९ रोजी सायंकाळी ४.३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, येरवडा, गुंजन थिएटरजवळ होणार आहे. अधिक माहितीसाठी गणेश गंगाळे यांच्याशी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० पर्यंत संपर्क साधावा. मो. क्र. ८८८८७५८६७६

टॅग्स :sarpanchसरपंचLokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्