शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आज जागतिक आदिवासी दिन :जुलमी राजवटीच्या विरोधात आदिवासींचा लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 12:21 IST

शासकांकडून अन्याय झाल्यास त्यांच्याविरुद्ध महादेव कोळी समाजाने थेट बंडाचेदेखील निशाण फडकाविले होते.

ठळक मुद्देमुघल, पेशवाई, ब्रिटिशांच्या विरोधात केले बंड

नितीन ससाणे - जुन्नर : दुर्गम भागात राहणाऱ्या भातशेती करणाऱ्या कष्टकरी महादेव कोळी समाजाने शेतीबरोबरच मुघलकाळात, पेशवाईत, तसेच ब्रिटिशकाळात तत्कालीन शासकांच्या सैन्य दलात तसेच मुलकी सेवेत प्रामाणिकपणे कामे केली होती. परंतु, याच शासकांकडून अन्याय झाल्यास त्यांच्याविरुद्ध थेट बंडाचेदेखील निशाण फडकाविले होते. स्थानिक कोळ्यांनी केलेल्या या बंडाची माहिती  इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रा. लहू गायकवाड यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे ‘शिवनेरीची जीवनगाथा’ या पुस्तकाच्या माध्यमातून पुढे आणली आहे.जुन्नर परिसर १६३६ च्या सुमारास मुघल राजवटीच्या अधिपत्याखाली आला. परिणामी स्थानिक कोळी समाज आणि मुघलांमध्ये संघर्ष सुरू झाला. १६५० मध्ये कोळी समाजाने त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले. मुघलांनी बंड केलेल्या कोळ्यांना पकडून शिवनेरीवर कैदेत टाकले. गडाच्या बालेकिल्ल्यावर त्यांना निर्दयीपणे ठार मारले. इतरांना कायमची दहशत बसावी व परत बंडाचा विचार करू नये, असा इशारा या नरसंहारातून देण्यात आला. कोळ्यांचा बंडाशी निगडित असणाऱ्या या ठिकाणावर चार बाजूला मध्यभागी चार कमानी असणाऱ्या चिरेबंदी दगडांच्या भिंतीवर तोललेला घुमट असलेली वास्तू आहे. याला कोळी चौथरा म्हणतात.

सन १७६४ मध्ये माधवराव पेशव्यांनी त्यांच्या प्रशासनात केलेल्या बदलाची परिणती शिवनेरी व पुरंदर किल्ल्यावर कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली. शिवनेरी किल्ल्यावरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने याने कामावरून कमी केले होते. रामचंद्र माने याने १५ सप्टेंबर १७६४ रोजी शनिवारवाड्यावर राघोबादादा यांस बंड मोडण्यासाठी अवघड जात असल्याबद्दलची माहिती पत्राने कळविली होती. कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानकपणे हल्ला करतात अशाच प्रकारचा हल्ला करून त्यांनी नाणेघाटाचा जवळील जीवधनचा किल्ला ताब्यात घेतला होता.  शिवनेरीवर उधो वीरेश्वराचे धोरणांना विरोध करण्यासाठी सन १७७५ मध्ये कोळ्यांनी शिवनेरी परिसरात दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व संताजी सीरकंदा याने केले. बंड मोडून काढण्यासाठी सवाई माधवरावाने व बारभाई मंडळाने वीरेश्वराच्या मदतीसाठी पुण्यातून गारदी पाठविले होते. वीरेश्वराने गारद्यांच्या मदतीने कोळ्यांचे बंड मोडून काढले. तर कोळी सरदारांना पकडून शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून गेला होता. पुढे संताजीने १७८१ मध्ये पुन्हा बंड केले. ....पहिल्या छायाचित्रात शिवनेरीच्या बालेकिल्ल्यावरील कोळी चौथरा. तर, दुसऱ्या छायाचित्रात दुसऱ्या बाजीरावाने शिवनेरीवरील बंडवाल्यांची चौकशी करून त्यांच्या घरांची व वतनाची, जमिनीची जप्ती करून सनद सादर करण्याच्या मोडी लिपीतील पत्राच्या सुरुवातीचा भाग. ...........ब्रिटिशकाळात इंग्रज अधिकाऱ्यांनी जुन्नर परिसरातील किल्ल्यांचा ताबा घेतला. ब्रिटिशांनी आदिवासी कोळ्यांच्या जीवनपद्धतीस अडथळे आणले. त्यांना कामावरून कमी केले. त्यांना चोर ठरविले म्हणून १८३९ मध्ये त्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले. बंडाचे नेतृत्व रामचंद्र गोरे, भाऊ खोरे, चिमणाजी जाधव यांनी केले. ब्रिटिशांनी रामचंद गोरे यांना पकडून फाशी दिले. तर, इतर ५४ लोकांना  आजन्म कारावासाची शिक्षा केली होती.  

सन १८०० ते १८०५ या काळात दुसऱ्या बाजीरावाने शिवनेरीवरील बंडवाल्यांची चौकशी करून त्यांच्या घराची व वतनाची, जमिनीची जप्ती करून सनद सादर करण्याचे मोडी लिपीतील पत्र उपलब्ध आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरhistoryइतिहास