शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आज मान्सूनचा पहिला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 6:25 AM

निवडणूक वर्षात यंदाचा मान्सून कसा असेल, याविषयी सध्या सर्वत्र उत्सुकतेचा विषय असून भारतीय हवामान विभागातर्फे पहिला दीर्घकालीन पावसाचा अंदाज सोमवारी दुपारी जाहीर करण्यात येणार आहे़

पुणे : निवडणूक वर्षात यंदाचा मान्सून कसा असेल, याविषयी सध्या सर्वत्र उत्सुकतेचा विषय असून भारतीय हवामान विभागातर्फे पहिला दीर्घकालीन पावसाचा अंदाज सोमवारी दुपारी जाहीर करण्यात येणार आहे़ आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाने हा अंदाज जाहीर करण्यास परवानगी दिली आहे़ मात्र, त्या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्र्यांना उपस्थित राहता येणार नाही, असा आदेश दिला असल्याचे सांगण्यात आले़देशभरातील मान्सून कसा असणार याचा पहिला दीर्घकालीन अंदाज हवामान विभागामार्फत १५ एप्रिलच्या दरम्यान जाहीर केला जातो़ त्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती पुण्यातील केंद्रामार्फत नवी दिल्ली कार्यालयाला पाठविण्यात आली आहे़ आचारसंहिता असल्याने मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यासाठी हवामान विभागाने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती़ त्यात त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना यावेळी उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती़ त्यावर निवडणूक आयोगाने या पूर्वी मान्सूनचा अंदाज व्यक्त करताना कोणी मंत्री उपस्थित राहिले होते का याची माहिती मागवली़अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे़ मात्र, यावेळी केंद्रीय मंत्र्यांना उपस्थित राहता येणार नाही, अशी सूचना केली़मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल, याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता असते़ त्यात यंदा एल निनोचा प्रभाव असल्याने त्याचा भारतीय मान्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचा अंदाज अमेरिकन हवामान संस्था,आॅस्ट्रेलियन संस्था तसेच स्कायमेट यांनी व्यक्त केला आहे़ स्कायमेटने यंदा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता़>यंदाच्या पावसाचे काय?गेल्या वर्षी भारतीय हवामान विभाग व स्कायमेटने ९७ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता़ मात्र, २०१८ मध्ये सरासरीच्या ९१ टक्के पाऊस होऊन देशाच्या अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यंदा पाऊस कसा असणार याविषयी उत्सुकता वाढली आहे़

टॅग्स :Rainपाऊस