Pune Crime: सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 20:42 IST2023-09-15T20:40:29+5:302023-09-15T20:42:51+5:30
ही घटना कोंढव्यातील अजमेर पार्क येथे घडली...

Pune Crime: सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेत आत्महत्या
पुणे : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या दररोजच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना कोंढव्यातील अजमेर पार्क येथे घडली. फरजीन मोसीन शेख (३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मोसीन अस्लम शेख (३८), शीरीन अस्लम शेख (३५), शाहीन अस्लम शेख (४०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जाहीद शेख (४०, रा. नाना पेठ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, मोसीन आणि फरजीन यांचा २००७ साली निकाह झाला होता. त्यानंतर मोसीन आणि त्याच्या बहिणी फरजीनाला त्रास देत होत्या. शिवीगाळ करून तिला मारहाण करण्यात येत होती. या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून फरजीनने १३ सप्टेंबर रोजी घरातच गळफास घेत आत्महत्या केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एच. एच. शेख करत आहेत.