शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

काळ आला होता पण.. जेऊर येथे लालबावटा उडवून रेल्वे गेली सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 20:27 IST

रेल्वे रुळावर लावलेला लाल बावटा पाडुन एक्स्प्रेस जोरात गेली. मोठा अनर्थ टळला असला तरी रेल्वे विभागाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे...

ठळक मुद्देमोठी दुर्घटना टळली, गेटमन आणि स्टेशन मास्टरचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

नीरा :   नीरा-वाल्हे दरम्यान असलेल्या रेल्वे लाईनवर जेऊर येथील रेल्वेफाटक सुपरफास्ट एक्सप्रेसची वेळ असतांनाही रेल्वे फाटक उघडे राहिले.  अचानक वेगाने आलेल्या हजरत निजाम्मूद्दीन (१२६२९) संपर्क एक्सप्रेसमुळे रेल्वेलाईल ओलांडणा-या नागरिकांची घाबरगुंडी उडाली. ही गाडी येताना ट्रकवर कुठलाही नागरिक नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली. ही घटना बुधवारी (दि. १०) सकाळी ९.१० वाजता जेऊर रेल्वे फाटक येथे घडली.  गेट उघडे असल्याने गेटमनने रेल्वे ट्रकवर रेल्वे चालकाला दिसण्यासाठी लाल झेंडा लावला होता. मात्र, हा झेंडा उडवून गाडी वेगात पुढे गेली. नीरा वाल्हे रेल्वे लाईन दरम्यान जेउर येथे यांत्रिक सिग्लल नसलेले रेल्वे गेट आहे. येथील गेटमन द्वारे हे रेल्वे येताना आणि जातांना हे फाटक बंद केले जाते. बुधवारी सकाळी ९ वाजता सुपरफास्ट रेल्वेची वेळ असतांनाही हे फाटक उघडे राहिले. हे फाटक उघडे आहे याची माहिती रेल्वे चालकाला व्हावी यासाठी गेटमनने रेल्वेट्रकवर लाल झेंडा लावला होता. ९ च्या सुमारास या ट्रकवरून  हजरत निजाम्मूद्दीन (१२६२९) संपर्क एक्सप्रेस ही वेगाने याली. यावेळी या रेल्वे लाईनवरून नागरिकांची ये-जा सुरू होती.   प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९.१० वाजता पंढरपूर पालखी मार्गावरुन जेऊर गावाकडे जाणा-या रस्त्यावरील रेल्वे फाटक (क्रं.२८ सी - २ई)  उघडे असल्याने वाहनचालक आपली वाहने बिंदक्त पणे नेत होती. अचानक रेल्वे गाडीचा आवाज आल्याने दुचाकीस्वारांनी आरडाओरडा केला.  याच वेळी जुऊर येथील रहिवासी संभाजी ठोंबरे आपल्या चारचाकी मारुती अल्टो कारने जेऊरकडे निघाले होते. त्यांच्या गाडीने फाटक ओलांडत असताना समोरील दुचाकीस्वारांनी आरडाओरडा केला असता ठोंबरे यांनी आपली कार तात्काळ थांबवली व मागे घेतली. रेल्वे फाटक उघडे असल्याची माहिती देणारा ट्रॅकवर गेटमनने लावलेला लाल झेंडा असतांना रेल्वे चालकाने गाडीचा वेग करणे अपेक्षित होते. मात्र, रूळावरील  हा झेंडा उडवून गाडी वेगात निघून गेली. या घटनेत कोणतीही हानी झाली नसली तरी घटना गंभीर असल्याने पुणे डिव्हिजनलचे चौकशी अधिकारी जॉर्ज यांनी दुपारी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली.    सकाळी घडलेल्या घटनेबाबत रेल्वेच्या कर्मचा-यांनी  कमालीची गुप्तता पाळत जवाबदारी टाळण्याचे प्रयत्न केले. नीरा रेल्वे स्टेशन मास्टर वाल्हे स्टेशन मास्टरवर जावाबदारी ढकलत होते. तर वाल्हे स्टेशन मास्टर यांनी  गेटमनला कल्पना दिली होती असे सांगितले. मात्र २८ सी - २ई क्रमांक फाटकावरील गेटमनने मला नीरा बाजुकडून गाडी येत आहे, अशी कल्पना दिली नसल्याने फाटक बंद केले नाही असे सांगितले. नीरा, वाल्हे व फाकट क्रमांक २८ वरील रेल्वे फोनच्या डिटेल्स चौकशी केल्यावर वास्तव परिस्थिती समोर येईल. पण दुर्घटना घडली असती तर नाहक कीती बळी गेले असते हा प्रश्र्न निर्माण झाला आहे अशी चर्चा लोकांनी केली.

टॅग्स :Bhigwanभिगवणrailwayरेल्वेAccidentअपघात