भिगवण : अकलूज येथील सयाजीराजे पार्कमध्ये मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या तुषार धुमाळ (वय ३८, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) यांचे पाळणा तुटून झालेल्या दुर्घटनेत अपघाती निधन झाले.
तुषार धुमाळ हे गोल फिरत्या पाळण्यात बसले असताना अचानक पाळण्याची साखळी तुटली. त्यामुळे बसण्याचे टेबल तुटून खाली जोरदार आपटले. त्या झटक्याने तुषार यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या अपघातात इतर तिघे गंभीर जखमी झाले आहे.