शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
3
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
4
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
5
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
6
कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'
7
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
8
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
9
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
10
Blood Moon: रविवारी आकाशात असेल ‘ब्लड मून’ची मेजवानी
11
पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, धावून आला अक्षय कुमार; नुकसानग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत
12
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
13
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
14
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
15
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
16
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
17
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
18
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
19
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
20
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले

पुणे : तिहेरी हत्याकांड प्रकरण ; आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 05:09 IST

गणेश पेठेतील तिहेरी हत्याकांडातील पुरावा नष्ट केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी सोनवणे याला अटक करून न्यायालयात हजर केले.

पुणे : गणेश पेठेतील तिहेरी हत्याकांडातील पुरावा नष्ट केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी सोनवणे याला अटक करून न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी आरोपीला ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खून करण्यात आलेल्या दोघांची ओळख पटली आहे.रवींद्र ऊर्फ बाब्या जगन सोनवणे (वय २८, रा. कागदीपुरा, कसबा पेठ) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी विक्रम ऊर्फ विकी दीपकसिंग परदेशी (३४, रा. परदेशीवाडा, नाडेगल्ली, पुणे) यालाही अटक करण्यात आली आहे. तो पोलीस कोठडीत आहे. शुक्रवारी (दि. २३) घडलेल्या घटनेत एकूण तीन मृतदेह सापडले. त्यातील दोघांची ओळख पटली आहे. नावेद रफीक शेख (वय १५, रा. नाडेगल्ली, गणेश पेठ) आणि संदीप नारायण वाघ (वय २६, रा. हडपसर) या दोघांची ओळख पटली आहे. अद्याप एकाची ओळख पटणे बाकी आहे. याबाबत नावेद याचे मामा आरीफ कासम शेख (२७) यांनी फरासखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. सहायक सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी सोनवणे याने रवींद्र आणि मुन्ना शेख नावाच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार मुन्ना याच्या शोधासाठी तसेच त्यांचे आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे. याबाबत व मृत्यू झालेल्या तिसºया व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. अधिक तपासासाठी सोनवणे याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.जमिनीच्या वादाप्रकरणी दोघांना अटकपुणे : जमिनीच्या वादावरून रखवालदाराला मारहाण करीत केलेल्या धान्यचोरीप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सराफ यांंनी आरोपींना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सुनील तुकाराम आव्हाळे (वय ५०) व वाल्मीक आत्माराम सातव (वय ३५, दोघे रा. आव्हाळवाडी) यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, सौरभ सुनील आव्हाळे आणि सुनील आव्हाळे यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ जून २०१६ ते १५ नोव्हेंबर २०१७ दरम्यान घडली आहे. दिलीपराज ज्ञानेश्वर भोकरे (वय ४९, रा. सहकारनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आव्हाळवाडी येथे जमीन आहे. तेथे रखवालदार महेंद्र रजपूत यांना राहता यावे म्हणून घर बांधायला घेतले होते. मात्र, आरोपींनी सदर जमीन आमची आहे, असे सांगून केलेले ७५ हजार रुपये किमतीचे बांधकाम पाडले. तसेच वॉचमनला तलवारीचा धाक दाखवून शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. तसेच आरोपींनी फिर्यादींच्या शेतातील ९० हजार रुपयांची ज्वारी व वॉचमनची सोन्याची साखळीही चोरली.शोरूममधून साडेचार लाख लांबविलेपुणे : दुचाकीच्या शोरूममधील ४ लाख ५२ हजार ६१० रुपये चोरट्याने चोरून नेले़ ही घटना सोमवारी पहाटे दीड वाजता घडली़ लक्ष्मीकांत इंगळे (वय २९, रा़ टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ इंगळे यांचे एअरपोर्ट रोडवर एस़ कुदळे सुझुकी शोरूम आहे़ कार्यालयाच्या टेबलच्या खालच्या ड्रॉवरमध्ये रोख रक्कम ठेवली होती़ शोरबमचे मागील उघडे पॅसेजचे उघड्या दरवाजावाटे चोरट्याने मध्यरात्री आत प्रवेश केला़

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPuneपुणे