शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तमनगर येथे बंदूक, तलवारीचा थरार; रविवारी रात्री दारूच्या दुकानात अज्ञातांकडून दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 17:28 IST

आर आर वाइन्स दुकानातून जवळपास ३ लाख रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरून घेऊन गेले

शिवणे : रविवारी रात्री संपूर्ण जग क्रिकेट विश्वचषकाचा थरार अनुभवत असताना उत्तमनगर येथील नागरिकांनी मात्र बंदूक आणि तलवारीचा थरार अनुभवला. रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास  अहिरे गेट येथील आर आर वाईन्स या दारूच्या दुकानात सहा अज्ञात तरुणांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. 

सर्वत्र क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला असताना अहिर गेट जवळ मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या आर आर वाइन्स दुकानातून जवळपास ३ लाख रुपयांची रोकड आणि  दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. दोन दुचाकीवर आलेल्या सहा अज्ञात युवकांनी हा दरोडा टाकल्याची माहिती मिळत आहे. सहा जणांपैकी दोन जणांनी तलवार हातात घेऊन ‘जो कोणी मध्ये येईल त्याला मारून टाकिन’ अशा प्रकारे लोकांना धमकावत तलवार हवेत फिरवली ज्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी घाबरुन आपली दुकाने बंद केली. दुचाकीवर आलेली सर्वजण साधारण २० ते २२ वयोगटातील असल्याचे यावेळी प्रत्यक्ष दर्शनींनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर दुकानातील कर्मचारी मनोज मोरे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त भिमराव टेळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सपोनि उमेश रोकडे यांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्याची माहिती घेतली. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेShivaneशिवणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीbikeबाईक