Pune: खरेदीच्या बहाण्याने तीन महिलांनी सराफातून पळवल्या सव्वा लाखाच्या बांगड्या

By नम्रता फडणीस | Updated: March 6, 2024 17:59 IST2024-03-06T17:58:57+5:302024-03-06T17:59:21+5:30

बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वेर्णेकर यांनी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली...

Three women stole bangles worth half a lakh from a bullion shop on the pretext of buying them. | Pune: खरेदीच्या बहाण्याने तीन महिलांनी सराफातून पळवल्या सव्वा लाखाच्या बांगड्या

Pune: खरेदीच्या बहाण्याने तीन महिलांनी सराफातून पळवल्या सव्वा लाखाच्या बांगड्या

पुणे : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी सव्वा लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्याची घटना समाेर आली आहे. याबाबत सराफी पेढीचे मालक ओंकार वेर्णेकर (वय २३, रा. बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली. त्यांची सोन्या मारुती चौकात सराफी पेढी आहे. खरेदीच्या बहाण्याने तीन महिला त्यांच्या सराफी पेढीत शिरल्या.

कर्मचाऱ्याला दागिने दाखविण्यास सांगितले. कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून महिलांनी प्लास्टिक ट्रेमधील एक लाख १६ हजार ८०० रुपयांच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरून नेल्या. बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वेर्णेकर यांनी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. दागिने चोरून पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत.

Web Title: Three women stole bangles worth half a lakh from a bullion shop on the pretext of buying them.