दोन अपघातांत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:29 IST2017-12-11T02:29:37+5:302017-12-11T02:29:47+5:30

पारगाव (ता. दौंड) येथील कोमल सतीश शिंदे (वय २०) या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातामध्ये कोमलचा वर्गमित्र दत्तू नरसिंग वागदुडे गंभीर जखमी झाला आहे.

 Three students die in two accidents | दोन अपघातांत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

दोन अपघातांत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथील कोमल सतीश शिंदे (वय २०) या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातामध्ये कोमलचा वर्गमित्र दत्तू नरसिंग वागदुडे गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी (दि. ९) लोणी कंद (ता. हवेली) परिसरातील लोणी कंद-केसनंद रस्त्यावर घडली.
याबाबत सविस्तर हकीगत अशी : कोमल व तिचा वर्गमित्र वाघोली येथील रामकृष्ण इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिकत होते. कॉलेजमधील प्रथम सत्रचा शेवटचा पेपर संपवून कोमल हिला बसस्टॉपजवळ सोडण्यासाठी दत्तू दुचाकीवर चालला होता. या वेळी एका टेम्पोला ओव्हरटेक करत असताना समोरून स्कूलबस येत होती. समोर बस दिसताच दत्तू याने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी पडल्याने कोमल रस्त्यावर पडली. याच वेळी समोरून येणारी स्कूलबस तिच्या डोक्यावरून गेली. त्यामुळे कोमल जागीच मृत्युमुखी पडली.
जखमी दत्तू यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात रविवारी रात्री उशिरा लोणी कंद पोलीस चौकीत कोमलचे वडील संदीप अनंता शिंदे (राहणार पारगाव ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री शोकाकुल वातावरणात कोमल हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title:  Three students die in two accidents