पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 20:52 IST2018-09-15T20:51:26+5:302018-09-15T20:52:45+5:30
गणेशोत्सव मंडळाचे कामकाज तपासण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांना अटक
पुणे : गणेशोत्सव मंडळाचे कामकाज तपासण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास महानगरपालिका व्हेईकल डेपोजवळील श्री गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ येथे घडली.
बबलू लालसाहब पितळे (वय ३३, रा. हनुमान नगर,कात्रज), परशुराम बसप्पा होसमनी (वय ३७, रा. गुलटेकडी) आणि राहुल रेवनआप्पा ढोणे (वय १९, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई डी. डी. रणसिंग यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी रणसिंग व त्यांचे सहकारी बीट मार्शल ड्युटी करताना श्री गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ येथे मंडळ तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी आरोपी आणि मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी फियार्दींना धक्काबुक्की, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा आणल्याने मंडळातील तिघांना पोलिसांनी अटक केली. उपनिरीक्षक आर. आय. उसगावकर तपास करत आहेत.